Headlines

CJP Protest Delhi Police Lathi Charge | बॅच नाही, चप्पल आणि तोंडाला रुमाल, लाठीचार्ज करणारे गुंड? – cockroach janata party protest delhi police lathi charge goons


Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

20 तारखेला दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं. मात्र त्याआधी जंतरमंतर मैदान आणि आंदोलन वेळी अनेक संशयास्पद घडामोडी घडल्या. आंदोलनाच्या आधीच्या रात्री एक दगडांनी भरलेला मोठा हायवा ट्रक थेट आंदोलनास्थळाजवळील रस्त्यावर आणून पार्किंगमध्ये लावण्यात आला होता. एवढंच नाहीतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आंदोलन झालं त्यावेळी पोलिसांच्या घोळक्यात काहींच्या अंगात वर्दी नाही. ज्यांच्या अंगात वर्दी आहे त्यांना नेम टॅक नाही ( बॅच नाही), पायात स्लिपर चप्पल, तोंडाला रुमाल, डोक्यात फक्त हेल्मेट गुंडाळून साध्या वेशातील अनेकांनी दिल्लीतील आंदोलनावेळी हात साफ करत विद्यार्थ्यांना अंत्यंत क्रूरपणे मारहाण केली. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. ज्यावरून दिल्ली पोलिसांवर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आलेत. सरकारी बळाच्या मागे राहून लाठीचार्ज करणारे हे पोलीस होते की गुंड? आणि आंदोलनात पोलिसांवर शंका येणारे कोणते महत्त्वाचे मुद्दे होते ते पाहणार आहोत.#CockroachJanataParty #JantarMantarProtest #DelhiPoliceLathiCharge #StudentProtestDelhi #DelhiPoliceExposedSuspicious police conduct during Cockroach Janata Party protest at Jantar Mantar on 20th July raises serious questions. Unidentified men in civilian clothes carried out brutal lathi charge on students. Viral videos expose Delhi Police irregularities including missing uniforms, name badges & stone-laden truck.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत