Headlines

पावर बँक विसरा! 8000mAh ची बॅटरी घेऊन येतोय Redmi Note 17; भारतात लॉन्चपूर्वीच किंमत लीक। Maharashtra Times


शाओमीचा सब-ब्रँड रेडमी आपली बहुप्रतिक्षित ‘Redmi Note 17’ सिरीज भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चीनमध्ये यशस्वी पदार्पण झाल्यानंतर, आता भारतात या फोनची किंमत आणि लॉन्चची तारीख लीक झाली आहे. हा स्मार्टफोन 8000mAh ची अवाढव्य बॅटरी आणि 50MP च्या प्रायमरी कॅमेरासह ग्राहकांच्या भेटीस येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया.

Redmi Note 17 । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
लोकप्रिय टिपस्टरने दावा केला आहे की Redmi Note 17 हा 6 ऑगस्ट रोजी भारतात सादर केला जाऊ शकतो. चीनमध्ये याच्या बेस व्हेरिएंटची किंमत जवळपास 18,000 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे भारतातही हा फोन बजेट सेगमेंटमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स देईल. या नव्या सिरीजमुळे बाजारातील इतर कंपन्यांचे टेन्शन वाढणार आहे.

Redmi Note 17 काही काळापूर्वी Redmi Note 17 Pro सह चिनी बाजारात लाँच करण्यात आला होता. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारात लाँच झालेल्या Redmi Note 15 आणि Redmi Note 15 Pro ची जागा या स्मार्टफोनने घेतली आहे.

चीनमध्ये लाँच झाल्यानंतर भारतात या स्मार्टफोनची किंमत आणि फीचर्सची माहिती लीक होऊ लागली आहे. अलीकडेच, एका रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आली आहे की मानक Redmi Note 17 ऑगस्टमध्ये भारतात लाँच केले जाऊ शकते, ज्यात चीनी व्हेरिएंटसारखेच स्पेसिफिकेशन असेल. आता, अलीकडेच एका टिपस्टरने या आगामी फोनची किंमत शेअर केली आहे, जी दर्शविते की हा मिड-रेंज फोन किती किंमतीत लाँच केला जाईल.

Redmi Note 17 ची भारतातील किंमत (अपेक्षित)

टिप्सटर योगेश ब्रार यांनी नुकतीच Redmi Note 17 च्या भारतीय व्हेरिएंटशी संबंधित माहिती दिली आहे. लीकमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारतात Redmi Note 17 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 30,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते. या फोनच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत असू शकते. हा फोन Xiaomi च्या HyperOS 3 सह येईल, जो Android 16 वर आधारित आहे.

Redmi Note 17 भारतात कधी लाँच होणार आहे?

रिपोर्टनुसार, Redmi Note 17 ला चार वर्षांचे OS अपग्रेड आणि पाच वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळतील. स्मार्टफोनमध्ये LPDDR4x रॅम आणि UFS 2.2 इंटरनल स्टोरेज देखील असू शकते. तथापि, टेक फर्मने अद्याप या तपशीलांची पुष्टी केलेली नाही, म्हणून त्यांच्यावर जास्त अवलंबून राहू नका.

Redmi Note 17 6 ऑगस्ट रोजी भारतात लाँच होणार असल्याच्या वृत्तानंतर हे घडले आहे. याशिवाय 11 ऑगस्टपासून हा हँडसेट देशात विक्रीसाठी उपलब्ध होईल, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलताना, बऱ्याच रिपोर्टवरून असे सूचित केले गेले आहे की स्मार्टफोन भारतात चिनी व्हर्जनप्रमाणेच फीचर आणि स्पेसिफिकेशन्स येईल.

Redmi Note 17 14 जुलै रोजी चीनमध्ये 1299 चीनी युआन (सुमारे 18,000 रुपये) च्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता, या किंमतीत फोनचे 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध असेल. या डिव्हाइसमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 4 जनरेशन 4 ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये 8000mAh बॅटरी, मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा