Headlines

शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे यांचा वाढदिवस उत्साहात!


आंबोली प्रतिनिधी : शिवसेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा सह्याद्रीच्या आंबोली चौकुळ पट्ट्यातील तरुण तडफदार व झुंजार युवा नेतृत्व दिनेश गावडे यांचा वाढदिवस यांचा वाढदिवस बुधवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त दिनेश गावडे यांच्यावर राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. विविध क्षेत्रातील या चाहत्यांच्या आपुलकी व प्रेमाने दिनेश गावडे अक्षरशः भारावून गेले.
आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, सभापती सुष्मिता जाधव, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, माजी माजी सरपंच, शिवसेना कार्यकर्ते यांनी दिनेश गावडे यांना वाढदिवसासह त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

खत वितरण उपक्रम लक्षवेधी

यावेळी दिनेश गावडे यांनी चौकुळ गावातील शेतकऱ्यांना खत वितरण केले. घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना खत देण्यासह शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन राबवलेला खत वितरणाचा उपक्रम लक्षवेधी ठरला. दिनेश गावडे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी थेट शेताच्या बांधावर आलेले पाहून शेतकरीही भारावून गेले. यावेळी शेतकऱ्यांनी दिनेश गावडे यांना हृदयपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत