ठाकरेंच्या याचिकेची सुप्रीम कोर्टात दखल, फुटीर खासदारांसह ओम बिर्लांना नोटीस, कोर्टात काय घडलं? – supreme court notice on shiv sena ubt petition to 6 mps and om birla
ठाकरेंच्या याचिकेची सुप्रीम कोर्टात दखल, फुटीर खासदारांसह ओम बिर्लांना नोटीस, कोर्टात काय घडलं? – supreme court notice on shiv sena ubt petition to 6 mps and om birla
२२ जून रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत ६ खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यानंतर या सहा फुटीर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाने एक मोठा निर्णय घेतला. या सहा फुटीर खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार बनले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करण्याच्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयाला ठाकरे गटाने थेट सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. आणि आता या ६ खासदारांच्या पात्रतेबाबत आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत झालेल्या विलीनीकरणावर सुप्रीम कोर्टानं ६ खासदारांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना नोटीस बजावली आहे. कोर्टात नेमकं काय घडलं आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयावर कोर्टाने काय म्हटलं? आणि ठाकरेंकडून शिंदेंकडे गेलेल्या ६ खासदारांबाबत नेमका काय निर्णय झालाय? तेच या व्हिडिओत जाणून घेऊया