Nashik News: वडाळा नाका ते द्वारका सिग्नलपर्यंतचा महामार्ग चिखलाने व्यापल्याने मंगळवारी दिवसभरात शंभरावर दुचाकीस्वारांची घसरगुंडी उडाली. चिखलातील ‘आपटी’मुळे सुदैवाने जीवित हानी टळली, तरी अनेक दुचाकीस्वार जायबंदी झाले. अनेकांची हाडेही मोडली!

मुंबई-आग्रा महामार्गावर सलग सहा वर्षांपासून पावसाळ्यात चिखलामुळे वाहने घसरल्यानंतर तीन वर्षांपूर्वी दुभाजकांची उंची वाढविल्याने गतवर्षी अपघात काहीस टळले होते. मात्र, यंदा पुन्हा अपघातांना निमंत्रण मिळण्यास सुरुवात झाली आहे. दुरुस्ती झालेली ठिकाणे सोडून इतरत्र पुन्हा महामार्ग चिखलमय होऊन दुचाकीस्वारांची ‘घसरगुंडी’ उडत आहे.
CJP Protest Delhi: सख्खा भाऊ गेलाय, आम्हाला न्याय हवा…! नाशिकच्या तरुणाची व्यथा; मोर्चासाठी गाठली दिल्ली
मंगळवारी दिवसभरात शंभरपेक्षा अधिक दुचाकी घसरल्याने यंत्रणेचीही धावपळ उडाली होती. अनेक दुचाकीस्वारांना इजा झाल्यानंतर तेथे रुग्णवाहिका तैनातीसह वाहतूक पोलिसांनीही तैनातीत वाढ केली. ‘न्हाई’ सह अग्निशामक दलाच्या पथकांनाही पाचारण करण्यात आले. त्यामुळे तात्पुरते अपघात टळले, तरी कोट्यवधी रुपये खर्चुन उभारलेल्या उड्डाणपुलामुळे निर्माण होणाऱ्या ‘चिखलाचा’ मार्ग केव्हा ‘घसरगुंडी’ मुक्त होणार हा प्रश्न मात्र जैसे थे राहिला.
राष्ट्रीय महामार्गावरील चिखलामुळे तीन वर्षांपूर्वी पोलिसांच्या वाहतूक शाखेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (न्हाई) पत्र दिले होते. त्यानुसार ज्या ठिकाणी यापूर्वी पावसाळ्यात चिखलामुळे अपघात झाले, तेथे दुभाजकांची उंची वाढविण्यात आली होती. मात्र, वडाळा नाका ते द्वारका या रस्त्यावरील दुभाजकांची उंची वाढविली नव्हती. त्यामुळे सततच्या पावसाने तेथे चिखल निर्माण झाला आहे.
Nashik News: रिक्षा प्रवासास मोजावे लागणार जादा पैसे, नाशिकमध्ये ‘आरटीओ’द्वारे सुधारित भाडेदर लागू; किती असतील दर?
मंगळवारी सकाळी दुचाकीस्वार वारंवार ‘आपटी’ खाऊ लागल्याने वाहतूक पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. त्यानंतर ‘न्हाई’ आणि अग्निशामक दलाच्या पथकांनी रस्त्यावरील चिखल दूर केला. पोलिसांनी बॅरिकेडिंग करून वाहतूक मार्गात तात्पुरता बदल केला. ट्रॅफिक वॉर्डन आणि पोलिस अंमलदार नेमून दुचाकीस्वारांना वाहने सावकाश चालविण्याचे सूचित करण्यात येत होते.
…ही आहेत कारणे
-उड्डाणपुलावरून महामार्गावर पडणारे पाणी
-उड्डाणपुलाखालील चुकीची पाइपलाइन
-दुभाजकांतील झुडपांखालील माती घसरणे
-सर्व्हिसरोडच्या दिशेने साचणारा गाळ
-मोठ्या ट्रकमधून माती पडून होणारा चिखल
Nashik Crime : दुसऱ्या बायकोचा जीव घेतला, आईला वाचवायला मध्ये पडलेल्या चिमुकल्यानेही प्राण गमावले, बापाचं टोकाचं पाऊल
-द्वारका येथे ‘ग्रेड सेपरेटर’चे काम सुरू असल्याने तेथील माती अवजड वाहनांतून नेण्यात येत आहे. यासह उड्डाणपुलाखालून पुढे जाणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांना लागलेला चिखल महामार्गावर साचत आहे. त्यातच उड्डाणपुलावरून खाली पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे तेथे चिखल होत असून, वाहने घसरत आहेत.
-वडाळा नाका ते द्वारकाकडे जाणारा सर्व्हिसरोडदेखील काही प्रमाणात खोदण्यात आला आहे. तेथील मुरूम, माती, रिक्षा व इतर वाहनांच्या चाकांना असलेल्या मातीचा चिखल साचत असल्याने तेथेही वाहने घसरत आहेत.
-वडाळा नाका ते द्वारका यासह जुना आडगाव नाका येथील रस्त्यावर चिखल वाढल्यानंतर प्रशासनाने गतवर्षी हा रस्ता साफ करून खडबडीत केला, त्यामुळे दुचाकी घसरणार नाही. शिवाय पावसाचा जोर कमी झाल्यावर या ठिकाणची पुन्हा पाहणी करून दुभाजकांची उंची वाढविण्याबाबत निर्णय होईल, असे ‘न्हाई’तील सूत्रांनी सांगितले होते. यंदाही त्याच स्वरूपाचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

