होर्मुझनंतर आणखी एका सामुद्रधुनीवर नाकेबंदी
सौदी अरेबियाने साना आंतरराष्ट्रीय विमानतळावर घातलेली नाकेबंदी आणि हवाई हल्ल्याच्या प्रत्युत्तरात येमेनच्या हुती बंडखोरांनी सौदी अरेबियाविरुद्ध सागरी नाकेबंदी लादली आहे. या नाकेबंदीमुळे ‘बाब एल-मंडेब’ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. बाब एल-मंडेब सामुद्रधुनी लाल समुद्राकडे जाणारे एन्ट्री पॉईंट असून त्यातून होर्मुझप्रमाणेच साधारणपणे जगातील 12% व्यापार होतो.
C Vijayakumar: भारतीय IT उद्योगातील सर्वात महागडे CEO, महिन्याला 48 लाख पगार; ना TCS, ना इन्फोसिस, तिसऱ्याच कंपनीचा सीईओ सर्वात धनवान
हुतींचे लष्करी प्रवक्ते याह्या सारी यांनी एका व्हिडिओ निवेदनात सांगितले की, सौदी अरेबियाविरुद्धची सागरी बंदी त्वरित लागू होईल. त्यांनी याचे वर्णन ‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ (जशास तसे) अशा समीकरणाद्वारे केले.
इराण युद्धामुळे सागरी वाहतुकीला मर्यादा
अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर ताबा मिळवल्यानंतर या जलमार्गावर नाकेबंदी लादल्यावर सौदी अरेबियाने पर्यायी मार्ग म्हणून पूर्व-पश्चिम पाइपलाइनद्वारे क्रूडची वाहतूक लाल समुद्राकडे वळवली.
Labour Code Rules: 7 तारखेपर्यंत पगार, 2 दिवसांत फुल अँड फायनल; काय आहे नवीन कामगार कायद्याचा नियम?
पण आता हुतींनी बाब एल-मंडेबवर लादलेल्या नव्या नाकेबंदीमुळे सौदी अरेबियाचा या शेवटचा पर्यायी मार्गही बंद होण्याची शक्यता असून यामुळे आता दररोज सुमारे 25 लाख बॅरल तेल धोक्यात आल्याचे रॉयटर्सने सांगितले. इराणकडून होर्मुझ आणि हुतींनी बाब एल-मंडेब सामुद्रधुनीला नाकेबंदी लादल्यामुळे सौदी अरेबियावर एकाच वेळी दोन्ही प्रमुख सागरी मार्गांवर दबाव येत आहे.
हुतींच्या निर्णयाचा भारताला धोका कसा?
इराणच्या होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरल्यावर आता हुतींच्या या कारवाईचे भारतासाठी गंभीर परिणाम होऊ शकतात. पश्चिम आशियात अमेरिका-इराण यांच्या संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझ या आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गाबाबतही अनिश्चितता कायम आहे.
India Oil Imports: अमेरिकेची 100 टक्के टॅरिफची तयारी तरी, भारतीय बंदरांवर रशियन जहाजांची गर्दी! मित्र ठरला संकटमोचक
भारत एकूण खनिज तेलाच्या वापरापैकी 90% हून अधिक क्रूड परदेशातून आयात करतो आणि त्यापैकी मोठा हिस्सा पश्चिम आशियातून येतो. त्यामुळे येथील तणाव किंवा संघर्षामुळे बाब एल-मंडेब सामुद्रधुनीतून, जो लाल समुद्राला सुएझ कालव्याशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे, होणारी जहाजवाहतूक विस्कळीत होते, तेव्हा तेलाचे भाव वाढतात. परिणामी भारताचे आयात बिल वाढते, रुपया कमकुवत होतो, सरकारी तिजोरीवर ताण येतो आणि महागाईत भर पडते.
दुसरीकडे बाब एल-मंडेबच्या सामुद्रधुनीतून भारताच्या युरोपला होणाऱ्या निर्यातीचा मोठा हिस्साही जातो, त्यामुळे जहाजांना लाल समुद्राऐवजी आफ्रिकेला वळसा घालून जावे लागले तर, प्रवासाचा कालावधी वाढेल आणि माल पोहोचण्यास विलंब होईल.
मात्र, वाढत्या खर्चाचा केवळ तेलपुरता फटका मर्यादित राहणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक्स व मशिनरी यासारख्या क्षेत्रांमध्ये आयात आणि शिपिंग खर्च वाढू शकतो आणि मालवाहतुकीचा खर्च चढा राहिल्यास, विशेषतः जर बाब एल-मंडेबमधील तणाव आणि जवळच्या होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यत्यय एकाच वेळी उद्भवले तर, काही खाद्यपदार्थांच्या किंमतीही हळूहळू वाढू शकतात.

