Headlines

Gold Rate Prediction 2026; मध्यपूर्वेत युद्धज्वर शिगेला, सोन्यात मोठा ‘क्रॅश’ येणार! थेट 50 टक्के स्वस्ताईचा सांगावा? इतिहासाच्या पुनरावृत्तीचा धोका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Gold Rate Forecast 2026: सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी तेजीचा कल कायम राहिला आहे. मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी पडल्यापासून सोन्याच्या किंमतीत लक्षणीय चढ-उतारा झाले असून सोन्याची किंमत उच्चांकावरून 25 ते 30 टक्क्यांनी घसरले आहेत, त्यामुळे आता सोने सुरक्षित आश्रयस्थान आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

Gold Price Outlook 2026
सोन्याची किंमत आणखी वाढणार की घसरणार? एक्सपर्टचा नेमका अंदाज काय?
Gold Price Prediction: मागील काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये बराच चढउतार दिसून आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे की आता खरेदी खरेदीची योग्य वेळ आहे की थांबावे? दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी बाजार तज्ज्ञ ही घसरण एक चांगली संधी असू शकते, असं म्हणतात तर काहींचे म्हणणे आहे की सोन्याच्या किमतीत आणखी 50 टक्क्यांनी घट होऊ शकते.

सोन्याची किंमत 30 टक्के घसरली

सोन्याची किंमत 30 टक्के घसरली

भू-राजकीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही काळापासून देश-विदेशातील बाजारात सोन्याची चमक फिकी पडली. अमेरिकी बाजारात सोन्याचा दर 4000 डॉलरच्या आसपास उतरला आहे जो जानेवारीत 5600 डॉलरवर उसळला होता आणि MCX वर 1.90 लाखांवर पोहोचलेला. पण त्यानंतर सोन्याचा दर 25-30 टक्क्यांनी कमी झाला सध्या 1.42 लाखांवर व्यवहार करत आहे.

सोन्याचा ‘गोल्डन’ टाइम संपला का?

सोन्याचा ‘गोल्डन’ टाइम संपला का?

अशा परिस्थितीत, सोन्याचे सुवर्णयुग संपले आहे का? हाच प्रश्न बाजारात चर्चा रंगली आहे. जेव्हा जेव्हा जागतिक अनिश्चितता वाढते, तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढते, परिणामी किमती वाढू लागतात. पण, फेब्रुवारीच्या अखेरीस अमेरिकेने इराणवर हल्ला करूनही सोन्यामधील गुंतवणूकदारांची आवड मंदावली.

सोन्याची किंमत खरंच 50% घसरणार का?

सोन्याची किंमत खरंच 50% घसरणार का?

CoinCodex सारख्या काही टेक निर्देशकांनी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत या वर्षाच्या अखेरीस 2780 डॉलर्सपर्यंत घसरणीचा अंदाज वर्तवला आहे, जो जानेवारीतील उच्चांकापेक्षा जवळपास 50% कमी आहे. मात्र, आघाडीचे तज्ज्ञ, विशेषतः गोल्डमन सॅक्स आणि जेपी मॉर्गन म्हणतात की सोन्याचा दर 3800 ते 4000 डॉलर्सच्या मजबूत सपोर्ट झोनभोवती स्थिर राहील आणि पूर्णपणे कोसळणार नाही.

सोनाच्या दरात ऐतिहासिक घसरणीचा अंदाज

सोनाच्या दरात ऐतिहासिक घसरणीचा अंदाज

सोन्याच्या दरातील 50% घसरणीचा तज्ज्ञ 1980 आणि 2012-13 या वर्षांचा हवाला देत आहेत. पण ऐतिहासिकदृष्ट्या सोन्याची किंमत सर्वकालीन उच्चांकावरून केवळ एकदाच 50% किंवा त्याहून अधिक घसरली पण, 20% ते 30% पर्यंत अनेक घसरणी झाल्या आहेत.

सोन्याच्या सुपर रॅलीला कारणीभूत ठरलेले घटक?

सोन्याच्या सुपर रॅलीला कारणीभूत ठरलेले घटक?

गेल्या काही वर्षांत सोन्याचा भाव सुपरफास्ट वेगाने उसळला आहे. कमी व्याजदर, चलनविषयक शिथिलता, भू-राजकीय अनिश्चितता आणि मध्यवर्ती बँकांच्या प्रचंड खरेदी यांसारख्या घटकांनी सोन्याच्या सुपर रॅलीला चालना दिली, पण आता सोन्याच्या तेजीला चालना देण्यासाठी हे घटक पुरेसे नाही आणि सोन्याच्या या सुवर्णकाळाने आपला अंतिम टप्पा गाठला आहे.

मध्यवर्ती बँका सोन्याची घट रोखणार

मध्यवर्ती बँका सोन्याची घट रोखणार

बॉण्डवरील परतावा कमी झाल्यावर सोन्यातील गुंतवणूक आणखी आकर्षित बनते. सध्या जागतिक बाजारात बॉण्डवरील परतावा आता वाढत आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांची सोन्याबाबत आवड कमी होत असली तरीही मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी सुरू ठेवतील, ज्यामुळे अधूनमधून आधार मिळताना दिसेल आणि मध्यवर्ती बँकांच्या याच खरेदीमुळे सोन्यामध्ये नवीन मोठी तेजी येण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे पुढील काही वर्षांसाठी सोने गुंतवणूकदारांसाठी कमी परतावा देणारी मालमत्ता राहू शकते.

1980 मधील ऐतिहासिक घसरण1980 मधील ऐतिहासिक घसरण

1980 मधील ऐतिहासिक घसरण1980 मधील ऐतिहासिक घसरण

जानेवारी 1980 मध्ये इराण संकट आणि अफगाणिस्तानवर सोव्हिएतच्या हल्ल्यानंतर जागतिक चलनवाढीत मोठी वाढ झाली, ज्यामुई सोन्याची किंमत 850 डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. त्यानंतर लगेचच अमेरिकी फेडरल रिझर्व्हने ही चलनवाढ रोखण्यासाठी व्याजदरांत जवळपास 20% पर्यंत वाढ केली आणि सोन्याची चमक फिकी पडू लागली. परिणामी, 1982 ते 1985 पर्यंत सोन्याचा दर 300 ते 350 डॉलरपर्यंत घसरला. म्हणजे उच्चांकावरून 60% पेक्षा जास्त घट झाली आणि किमती निम्म्याहून अधिक कमी झाल्या.

गोल्ड रेट 4500 डॉलर्सवर उसळी घेणार?

गोल्ड रेट 4500 डॉलर्सवर उसळी घेणार?

त्याचवेळी, आआधी वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने आपल्या ‘मिड-इयर आउटलूक’ अहवालात म्हटले की, सध्याच्या किमतींनुसार सोन्याची किंमत मध्यम विकास दर आणि वाढलेल्या महागाईच्या अनुषंगाने ठरवली जात आहे. त्यामुळे सध्या तरी सोन्याची किंमत रेंज-बाउंड राहू शकतात. पण, वाढते भू-राजकीय धोके पाहता सोन्याच्या किमतीत तेजी येण्याची शक्यता WGC ने नाकारली नाही आणि सोने $4500 पर्यंत उसळी घेण्याची शक्यता वर्तवली.

2011 ते 2015 ची मंदी

2011 ते 2015 ची मंदी

साल 2008 च्या जागतिक मंदीनंतर सोन्यात गुंतवणुकीची मागणी वाढली. सप्टेंबर 2011 मध्ये सोन्याचा दर $1,920 तात्काळ उच्चांकावर उसळला मग, जसजसा मंदीचा प्रभाव ओसरत गेला, अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्था रुळावर कमबॅक करू लागली तसतसे गुंतवणूकदारांनी सोन्यातून शेअर बाजारात पैसे वळवण्यास सुरुवात केली.डिसेंबर 2015 पर्यंत सोन्याचा भाव $1050 च्या नीचांकी पातळीवर घसरला, जी उच्चांकीपासून जवळपास 45% घट होती.