Spain FIFA World Cup Winner 2026 : स्पेनने वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील विजेतेपदाचा १६ वर्षांचा दुष्काळ रविवारी अखेरीस संपुष्टात आणला. अर्जेंटिनाला १-० अशा फरकाने पराभूत करत वर्ल्ड कपवर स्पेनने नाव कोरले. या स्पर्धेबरोबरच युरोविजेत्या स्पेनने लिओनेल मेस्सीचे सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंग केले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
संजय घारपुरे, मुंबई : फेरान टोरेसने नोंदवलेल्या गोलच्या जोरावर स्पेनने फुटबॉल वर्ल्ड कप २०२६च्या अंतिम लढतीत गतविजेत्या अर्जेंटिनाला १-० असे हरवले आणि विजेतेपद पटकावले. यासह स्पेनने पुन्हा एकदा युरो कपपाठोपाठ वर्ल्ड कप उंचावण्याची कामगिरी केली. यापूर्वी, त्यांनी २००८मध्ये युरो कप जिंकला होता, त्यापाठोपाठ २०१०मध्ये वर्ल्ड कप उंचवला होता. या वेळी त्यांनी २०२४मध्ये युरो कप जिंकला होता, त्यापाठोपाठ आता वर्ल्ड कपही उंचावला. जागतिक क्रमवारीत अर्जेंटिना पहिल्या, तर स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, हे संघ आतापर्यंत चौदा वेळा आमनेसामने आले होते. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी सहा लढती जिंकल्या होत्या, तर दोन लढती ‘ड्रॉ’ झाल्या. स्पेनने सातत्याने आक्रमक चाली रचल्या.
यमाल, ॲलेक्स बाएना, फेरान टोरेस, पेड्री यांनी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझने अप्रतिमरित्या त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. मात्र, अखेरीस अतिरिक्त वेळेतीतल ब्रेकनंतर पुढच्याच मिनिटाला निको विल्यम्सच्या पासवर फेरान टोरेसने (१०६ मि.) जबरदस्त गोल नोंदवला आणि स्पेनच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. यासह मेस्सीचे सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याचे स्वप्न भंगले.
२ – स्पेनने दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावला. यापूर्वी, स्पेनने २०१०मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
४ – अर्जेंटिनाला चौथ्यांदा (१९३०, १९९०, २०१४, २०२६) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा