Thane-Ulhasnagar Metro: मेट्रो मार्गिका ५साठी कशेळी टोल प्लाझा येथे डेपो बांधण्यात येत आहे. या ३२ किमी लांब मार्गिकेचं काम तीन टप्प्यात विभागलं असून पहिला टप्पा लवकरच पूर्ण होणार असून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी निविदा मागवल्या आहेत.
ठाणे: मेट्रो मार्गिका ५चं काम सध्या वेगाने सुरू आहे. फेज १चं काम सध्या अंतिम टप्प्यात असताना आता या मेट्रोसाठी कशेळी येथो डेपोचं कामही सुरू झालं आहे. जून २०२६ पर्यंत या प्रकल्पाचं २३ टक्के काम पूर्ण झालं होतं. ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगरपर्यंत जोडणाऱ्या या मार्गिकेसाठी हे कारशेड उभारण्यात येत आहे. नुकतच मेट्रो मार्गिका ५ चा विस्तार उल्हासनगरपर्यंत होणार अशी घोषणा केली होती. आता या नव्या मार्गिकेच्या बांधकामासाठीही तयारी सुरू झाली आहे.
इतर दोन फेजचं काम सुरू होणार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्रधिकरणाने भिवंडीतील धामणकर नाका ते उल्हासनगरपर्यंत मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.मेट्रोच्या पहिल्या फेजचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहेत. एमएमआरडीएने ११ जुलै रोजी मेट्रोच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेजसाठी मेट्रोचे व्हायाडक्ट आणि स्थानकांशी संबंधित इतर कामांसाठी निविदा मागवल्या होत्या. कंत्राटदार नेमल्यानंतर सर्व कामं ४८ महिन्यांमध्ये काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असेल.
दरम्यान, मेट्रो मार्ग ५च्या दीर्घकालीन संचालन, देखभाल आणि मेट्रोचे रेक्स उभे करण्यासाठी कशेळी टोल नाक्याजवळ सुमारे २७ हेक्टर जागेवरती हे डेपो बांधलं जात आहे. या डेपोमध्ये ३० मेट्रो रेक हाताळण्याची क्षमता असेल. त्यासह वर्कशॉप, टेस्ट ट्रॅक, डेपो कंट्रोल सेंटर, प्रशासकीय इमारत, कर्मचारी निवास, उपयुक्तता पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक देखभाल व्यवस्थांनी सुज्ज डेपो बांधण्यात येणार आहे.
मेट्रो मार्ग ५ कसा असेल?
ठाणे-भिवंडी-कल्याण-उल्हासनगरदरम्यान धावणारी मेट्रो मार्गिका ५ ३४.२१ किलोमीटर लांब असेल. या मार्गिकेवर एकूण १९ स्थानकं असतील. या प्रकल्पाचं विभाजन प्रमुख तीन फेजमध्ये केलं आहे. पहिल्या फेजमध्ये ठाण्यातील कापुरबावडी आणि भिवंडीतील धामणकर नाक्यादरम्यान पायाभूत सुविधांचं काम सुरू केलं आहे. ही कामं सध्या अंतिम टप्प्यात आहेत. दुसऱ्या फेजमध्ये धामाणकर नाका ते कल्याणमधील दुर्गाडी चौकापर्यंत मेट्रो मार्ग बांधण्यात येईल.
या फेजचं पण पुढे दोन टप्प्यात विभाजन केलं गेलं आहे. पहिल्या टप्प्यात धामणकर नाका ते रंजोळी जंक्शनपर्यंत बांधकाम केलं जाणार आहे. यामध्ये उन्नत मार्गासह ३ किमी लांब भुयारी मार्गाच्या बांधकामाचाही समावेश आहे. या मार्गावर एक उन्नत स्थानक आणि एक भूमिगत स्थानक असेल. दुसऱ्या टप्प्यात रंजोळी जंक्शन ते दुर्गाडी चौकापर्यंत बांधकाम केलं जाईल. या पट्ट्यात चार उन्नत स्थानकं आणि खाडीवरील एका पुलाच्या बांधकामाचा समावेश असेल.
शेवटी फेज ३मध्ये दुर्गाडी चौकापासून कल्याणमार्गे भोईवाडा आणि पुढे उल्हासनगरपर्यंत मार्गाचं काम करण्यात येणार आहे. हा टप्पा ११.८३ किमी लांब असेल व या मार्गावर चार उन्नत स्थानकांचा समावेश आहे. फेज २ आणि ३साठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराला हे काम पूर्ण करण्यासाठी ४८ महिन्यांची मुदत दिली जाणार आहे.
दरम्यान, फेज १ चं काम पूर्ण करून २०२६ च्या अखेरपर्यंच ठाणे ते भिवंडी मार्गावर मेट्रो सुरू करण्याचं एमएमआरडीएचं उद्दिष्ट आहे. या पट्ट्यावरील ९७ टक्क्यांहून अधिक बांधकाम पूर्ण झालं आहे. सध्या ओव्हरहेड विद्यूत खांब आणि इतर किरकोळ कामं शिल्लक आहेत. सध्या या मार्गाची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी केली जात आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा