Headlines

अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांच्या सासूबाईंची फसवलेली रक्कम परत:वारजे माळवाडी पोलिसांनी सायबर पथकाच्या मदतीने परत मिळवली




सिनेअभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांच्या सासूबाईंची ऑनलाइन फसवणूक करून बँक खात्यातून काढण्यात आलेली ३५ हजार रुपयांची रक्कम वारजे माळवाडी पोलिसांच्या सायबर पथकाने परत मिळवून दिली. पोलिसांच्या तत्पर कारवाईबद्दल चिरमुले कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले. कर्वेनगरमधील सुदर्शन अपार्टमेंट येथे राहणाऱ्या स्वाती शिरीष चिरमुले (वय ७०) यांना २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला होता. संबंधित व्यक्तीने एमएनजी गॅस कनेक्शनचे बिल थकीत असल्याचे सांगितले. बिल न भरल्यास गॅस जोडणी बंद होईल, अशी भीती दाखवत त्याने चिरमुले यांना ऑनलाइन प्रक्रिया करण्यास भाग पाडले. आरोपीने सांगितलेल्या सूचनांचे पालन केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ३५ हजार रुपये परस्पर काढून घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चिरमुले यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील सायबर कक्षाकडे तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाने तातडीने तांत्रिक विश्लेषण केले. पैसे जमा झालेले आरोपीचे बँक खाते शोधून ते गोठविण्यात आले. फसवणुकीची रक्कम ‘लिन’ करून न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर ३५ हजार रुपये स्वाती चिरमुले यांना परत करण्यात आले. सायबर फसवणूक झाल्यास नागरिकांनी विलंब न करता पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बाळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार रवींद्र गाडे आणि शशिकांत गोहिणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत