Headlines

8th Pay Commission Salary Hike; 400 टक्के पगारवाढ? 18000 मूळ पगार असणाऱ्यांना मिळणार 72 हजार Basic Pay, पण एकच अडचण; वेतन आयोगाकडे नजर


8th CPC News: साल 2026 शेवटच्या उत्तराधार्त पोहचला असून 8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची अद्याप प्रतीक्षा आहे, पण सरकारने नव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख जाहीर केलेली नाही. आठव्या वेतन आयोगाच्या सदस्यांच्या बैठका अजूनही सुरू असताना फिटमेंट फॅक्टर सर्वात चर्चित मुद्द्यांपैकी आहे. या दरम्यान, एक अशी मागणी समोर आली आहे, ज्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

18,000 रुपयांवरून 72,000 रुपयांपर्यंत वेतन वाढीचा प्रस्ताव

केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांनी 8 व्या वेतन आयोगासमोर आपल्या मागण्या आधीच सादर केल्या आहेत. प्रत्येक संघटनेने आपापल्या निकषांनुसार वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरची मागणी केली असून यापैकी एका संघटनेने आयोगाला किमान वेतन 18,000 रुपयांवरून 72,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

Maharashtra TimesSatya Nadella Salary: तुम्ही मंदी, AI च्या चर्चा करत राहा; मायक्रोसॉफ्टच्या सीओंनी उचलला 1 हजार कोटींचा पगार! एवढा पैसा आला कुठून?या मागणीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात थेट 400% वाढ होईल, म्हणजे फिटमेंट फॅक्टर 4 असेल तरच ही मागणी पूर्ण होऊ शकते. पण आठव्या वेतन आयोगासमोर ही मागणी कोणी केली?

400 टक्के पगारवाढीचा प्रस्ताव

डिफेन्स क्षेत्रातील कर्मचारी संघटना भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ – BPMS – ने 8 व्या केंद्रीय वेतन आयोगासमोर 72000 रुपयांपर्यंत किमान मासिक वेतन वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे, जी सध्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या 18000 रुपयांच्या किमान वेतनापेक्षा 400% जास्त आहे.

16 एप्रिल रोजी BPMS ने एक मसुदा प्रस्ताव सादर केलेला, जो बीपीएमएसचे सरचिटणीस रवींद्र कुमार मिश्रा यांनी प्रसारित केलेला. यामध्ये किमान वेतन, फिटमेंट फॅक्टर, वार्षिक वेतनवाढ आणि प्रस्तावित वेतन मॅट्रिक्स यांसारख्या तपशिलांचा समावेश होता. सातव्या वेतन आयोगाने 3 सदस्यांच्या कुटुंब रचनेच्या आधारावर किमान वेतन कॅलक्युलेट केलेले पण, भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाने कुटुंबातील सदस्यांची संख्या तीनवरून पाच करण्याची मागणी केली आहे.

Maharashtra TimesStock Crash: खटाखट परतावा देणारा शेअर धडाधड आपटला; 400 रुपयांवरून 12 रुपयांवर आला, गुंतवणूकदारांची पंचाईतआतापर्यंत वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांनी आठव्या वेतन आयोगाला मागण्या आणि सरकारची आर्थिक परिस्थिती या आधारावर आपल्या शिफारसी सादर केल्या असून पुढील काही महिन्यात आयोग अहवाल सरकारला सादर करेल आणि त्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेईल.

18,000 वरून 72,000 रुपयांपर्यंत वाढल्यास किती फायदा होईल?

वेतन आयोगाने 72,000 रुपयांचे किमान मूळ वेतन लागू केल्यास सध्याच्या 18,000 रुपयांवरून 54,000 रुपयांची थेट वाढ होईल, म्हणजेच नवीन मूळ वेतन सध्याच्या वेतनाच्या चौपट जास्त असेल. मात्र, कर्मचाऱ्याचे पूर्ण वेतन 72,000 रुपये होणार नाही तर मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर भत्ते जोडले जातील. तसेच इन्कम टॅक्स आणि इतर कपाती देखील लागू होतील. याशिवाय मूळ वेतनातील वाढीचा भविष्यात पेन्शन आणि इतर लाभांच्या कॅलक्युलेशनवरही परिणाम होऊ शकतो.

Maharashtra TimesSuccess Story : 300 रुपयांतून केली सुरुवात, आज 7 हजार कोटींचं साम्राज्य; Bector यांचा व्यवसाय विस्ताराचा फॉर्म्युला काय?

4 फिटमेंट फॅक्टर असल्यास पगार किती वाढणार?

अनुक्रमांक ग्रेड सध्याचे मूळ वेतन फिटमेंट फॅक्टर = 4 अपेक्षित पगारवाढ
1 लेव्हल 1 18,000 रुपये 72,000 रुपये 54,000 रुपये
2 लेव्हल 2 19,900 रुपये 79,600 रुपये 59,700 रुपये
3 लेव्हल 3 21,700 रुपये 86,800 रुपये 65,100 रुपये
4 लेव्हल 4 25,500 रुपये 102,000 रुपये 76,500 रुपये
5 लेव्हल 5 29,200 रुपये 116,800 रुपये 87,600 रुपये
6 लेव्हल 6 35,400 रुपये 141,600 रुपये 106,200 रुपये
7 लेव्हल 7 44,900 रुपये 179,600 रुपये 134,700 रुपये
8 लेव्हल 8 47,600 रुपये 190,400 रुपये 142,800 रुपये
9 लेव्हल 9 53,100 रुपये 212,400 रुपये 159,300 रुपये
10 लेव्हल 10 56,100 रुपये 224,400 रुपये 168,300 रुपये
11 लेव्हल 11 67,700 रुपये 270,800 रुपये 203,100 रुपये
12 लेव्हल 12 78,800 रुपये 315,200 रुपये 236,400 रुपये
13 लेव्हल 13 118,500 रुपये 474,000 रुपये 355,500 रुपये
14 लेव्हल 13 131,100 रुपये 524,400 रुपये 393,300 रुपये
15 लेव्हल 14 144,200 रुपये 576,800 रुपये 432,600 रुपये
16 लेव्हल 15 182,200 रुपये 728,800 रुपये 546,600
17 लेव्हल 16 205,400 रुपये 821,600 रुपये 616,200 रुपये
18 लेव्हल 17 225,000 रुपये 900,000 रुपये 675,000 रुपये
19 लेवल 18 250,000 रुपये 100,000 रुपये 750,000 रुपये
प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत