Headlines

8th Pay Commission Salary Calculation ; 3% हून थेट 6% दर वाढण्याची कर्मचाऱ्यांची अपेक्षा; मागणी मंजूर झालीच तर कर्मचाऱ्यांना मिळणार इतका पगार


संपूर्ण देशातील कर्मचारी मंडळी सध्या 8 व्या वेतन आयोगाच्या निर्णयाची वाट पाहत आहे. त्यांची अशी मागणी आहे की यंदाचा वेतनवाढीचा दर 6% इतका असावा. 7 व्या वेतन आयोगानुसार सध्याच्या सुरु वेतनवाढीचा दर 3% आहे. परंतु, वाढत्या महागाईत उदरनिर्वाह करण्यासाठी तो 6% असावा अशी मागणी करण्यात आली आहे. वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत.

8th Pay Commission Salary Calculation
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कर्मचाऱ्यांचे लक्ष 8 व्या वेतन आयोगाच्या निर्णयाकडे लागून आहे. जगभरात ठिकठिकाणी काहीना काही अडचणी आहेत. हल्लीच अमेरिका आणि इराण या दोन राष्ट्रांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते. याचा फार मोठा फटका जागतिक बाजरपेठेवर झाला होता. भारतातही या सगळ्या गोष्टींचे फार मोठे दुष्परिणाम दिसून आले. मुख्यतः देशातील सामान्य माणसांवर मोठा परिणाम झाला. देशात वाढत्या महागाईला सगळेच बळी जात आहेत. या वाढत्या महागाईमुळे देशातील कर्मचारीवर्ग 8 व्या वेतन आयोगाकडे फार अपेक्षा ठेवून आहेत

कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी अशी आहे की यंदाचा वार्षिक वेतनवाढीचा दर हा 6% असावा. वाढत्या महागाईत उदरनिर्वाह करण्यासाठी किमान 6% वेतनवाढ गरजेची असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मुळात, विविध कर्मचारी संघटनांची मागणी वेगवेगळी आहे. 7 व्या वेतन आयोगाने ठरवलेला दर पहिला तर तो 3% इतका आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की महागाई वाढल्यामुळे खर्चही वाढले आहे आणि त्या वाढत्या खर्च्यांसाठी इतका दर पुरेसा नाही, त्यामुळे किमान वेतनवाढ दरात किमान 6% वाढ करण्यात यावी.

विविध कर्मचारी संघटनांची वेगवेगळी मागणी

नॅशनल कौन्सिल ऑफ द जॉईंट कन्सलटेटिव्ह मशिनरी ( NC-JCM )ने वेतनवाढ संबंधित 6 टक्क्यांनी वाढ असावी अशी अपेक्षा वर्तवली आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन (AIDEF) आणि फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन (FNPO) ने वेतनवाढीचा दर 6% असावा अशी मागणी केली आहे. सगळ्यात मोठी मागणी ऑल इंडिया न्यू पेन्शन स्कीम एम्प्लॉयी फेडरेशन (AINPSEF) ने केली आहे. त्यांची मागणी आहे की वेतनवाढीचा दर 7% इतका असावा. तर इंडियन रेल्वेज सुपरव्हिजन असोसिएशनची मागणी आहे की यंदाची वार्षिक वेतनवाढ दर 5% इतकी असावी.

Maharashtra Timesपटापट पेमेंट करण्यासाठी UPI वापरत असाल तर आता वेळ लागणार, डिजिटल पेमेंटची पद्धत बदललीकाय म्हणतंय गणित?

लेव्हल 1 मधील 18,000 मूळ वेतन असलेल्या कर्मचारांना 3 टक्के वेतन वाढीनुसार 10 वर्षात एकूण 52 लाख बेसिक वेतन मिळू शकतो. तर 6% वेतन वाढीनुसार 10 वर्षात एकूण 59.79 लाख बेसिक वेतन मिळतो. एकंदरीत, वेतनवाढ दर 3% हून 6% केला तर 7.79 लाखांचा अतिरिक्त फायदा होऊ शकतो. लेव्हल 4 मधील 25,500 मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना 3 टक्के वेतन वाढीनुसार 10 वर्षात एकूण 73.67 लाख बेसिक वेतन मिळू शकतो तर 6% वेतन वाढीनुसार 84.70 लाख बेसिक वेतन मिळतो. एकंदरीत, वेतनवाढ दर 3% हून 6% केला तर 11.03 लाखांचा अतिरिक्त फायदा होतो.

लेव्हल 6 मधील 35,400 मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना 3 टक्के वेतन वाढीनुसार 10 वर्षात एकूण 1.02 कोटींचा बेसिक वेतन मिळू शकतो. तर 6% वेतन वाढीनुसार 10 वर्षात एकूण 1.18 कोटींचे बेसिक वेतन मिळू शकते. एकंदरीत, वेतनवाढ दर 3% हून 6% केला तर दहा वर्षात 15.32 लाखांचा अतिरिक्त फायदा होतो. लेव्हल 8 मधील 47,600 मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना 3 टक्के वेतन वाढीनुसार 10 वर्षात एकूण 1.38 कोटींचा बेसिक वेतन मिळू शकतो. तर 6% वेतन वाढीनुसार एकूण 10 वर्षात 1.58 कोटींचा बेसिक वेतन मिळतो. एकंदरीत, वेतनवाढ दर 3% हून 6% वर नेला तर पुढील दहा वर्षात एकूण 20.59 लाखांचा अतिरिक्त फायदा होतो.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा