Headlines

8th Pay Commission Report Submission Deadline; केंद्रीय कर्मचाऱ्यांची पगारवाढ लांबणीवर; मे 2027 पर्यंत 18 महिने मुदत, मग अंमलबजावणीचा मुहूर्त? शिफारशी सादर केल्यावर पुढे काय समजून घ्या


8th CPC News: गेल्या वर्षी 3 नोव्हेंनेर 2025 रोजी केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केलेली. नव्या वेतन आयोगाला केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक म्हणजे पेन्शनर्सची सॅलरी, भत्ते, निवृत्तीवेतन आणि सेवाशर्तींबाबत आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी आयोगाला 18 महिन्यांचा कालावधी दिला. आठव्या वेतन आयोगाने अद्याप शिफारशींचा ड्राफ्ट टायर केलेला नसून सल्लामसलत आणि मूल्यांकन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे वेतन आयोगाने मे 2027 पर्यंत आपल्या अहवाल सादर करणे अपेक्षित असून केंद्रीय कर्मचारी याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

18 महिन्यांची मुदत कधी संपते?

8व्या वेतन आयोगाची 3 नोव्हेंबर 2025 रोजी अधिकृत केली गेलेली आणि सरकारने शिफारशी तयार करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिलेला ज्याची मुदत मे 2027 पर्यंत आहे. याशिवाय आयोगाने सरकारला शिफारशी सादर करण्यासाठी वेगळी किंवा आधीची अंतिम मुदत जाहीर केलेली नसून अलीकडच्या पावसाळी अधिवेशनात अर्थ मंत्रालयाने संसदेत सांगितले की आयोग स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्यांत आपल्या शिफारसी सादर करेल.

Maharashtra TimesJob Layoffs: पुन्हा मोठा लेऑफ? रात्रीतून 21000 कर्मचारी काढले, आता नव्या कपातीची लाट; लाखोंना ‘सकाळी 6 च्या ईमेलची धास्ती’तसेच आयोगाने अद्याप शिफारसी सादर केलेल्या नाही, या वृत्तालाही दुजोरा देत आयोगाला केंद्राकडे नियमितपणे प्रगतीचा अहवाल सादर करणे बंधनकारक नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले आणि सांगितले की आयोगाला त्यांच्या Terms of Reference नुसार स्वतःची कार्यपद्धती ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे.

आठव्या वेतन आयोगाची पक्रिया कुठंवर आली?

शिफारशींचा ड्राफ्ट तयार करण्याच्या प्रक्रियेत सध्या आठवा वेतन आयोग सल्लामसलत आणि मूल्यमापनाच्या टप्प्यावर असून कर्मचारी संघटना, कामगार संघटना, निवृत्तीवेतनधारक संघटना आणि इतर संबंधित घटकांशी सतत चर्चा करत आहे.

Maharashtra TimesLakhpati Scheme: सरकारी हमी असलेली RD योजना; दरमहा फक्त 600 रुपये जमा करून 1 लाखांहून अधिक कमवा, 8 टक्केपर्यंत व्याजदरकेंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी तयार केल्या जाणाऱ्या आपल्या प्रस्तावांना अंतिम रूप देण्याआधी विविध संघटनांना समस्या आणि शिफारसी मांडण्याची संधी देणे या सल्लामसलत आणि चर्चा सत्राचा उद्देश आहे. वेतन आयोगाद्वारे विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बैठका घेतल्या जात असून जयपूर, चेन्नई, पुद्दुचेरी आणि चंदीगड यांसारख्या शहरांमध्येही पुढील काही महिन्यांमध्ये पुढील चर्चा सत्र आयोजित केले जाईल.

केंद्र सरकारचे कोट्यवधी कर्मचारी या वेतन आयोगाच्या शिफारशींकडे बारीक लक्ष ठेवून आहेत. यापैकी फिटमेंट फॅक्टर, किमान मूळ वेतन, सुधारित वेतन संरचना, भत्ते किंवा निवृत्तीवेतनातील सुधारणा यांबाबत संघटनांनी मागण्या केल्या आहेत.

Maharashtra TimesGold Rate: 1947 पासून सोने 1726 पट महागले; 80 वर्षांत 1.53 लाखांच्या पुढे, 10 हजारांच्या सोन्याचे आज किती झाले असते?

वेतन आयोगाने अहवाल सादर केल्यावर पुढे काय?

अशाप्रकारे, सरकारने दिलेल्या मुदतीत चर्चा आणि मूल्यमापन पूर्ण झाल्यावर आयोग आपल्या शिफारशी तयार करून केंद्र सरकारला सादर करेल. पण, अहवाल सादर करताच वेतन सुधारणांमधील शिफारशी तात्काळ लागू होणार असं नाही. प्रथम सरकार आयोगाच्या शिफारशींचे मूल्यांकन करेल आणि नंतर अंमलबजावणीबाबत निर्णय घेईल.

या दरम्यान, केंद्र सरकार आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे मान्य करू शकते, त्यात बदल करू शकते किंवा अंतिम बदल करण्याआधी इतर आर्थिक व प्रशासकीय बाबींदेखील विचार करू शकते. त्यामुळे आयोगाचा अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी एक वेगळी पायरी असेल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काय बदलू शकते?

आयोगाच्या ToR मध्ये वेतनश्रेणी, DA सह इतर भत्ते, निवृत्तीवेतन आणि फॅमिली पेन्शन तसेच सेवेशी संबंधित अटी यासह अनेक विषयांचा समावेश आहे. यापैकी फिटमेंट फॅक्टर सर्वात लक्षवेधी मुद्द्यांपैकी आहे. सहाव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 1.86 होता, तर सातव्या वेतन आयोगाने 2.57 निश्चित केलेला आणि आठव्या वेतन आयोगाने अद्याप फिटमेंट फॅक्टर निश्चित केला नसला तरीही 3 किंवा त्यापेक्षा जास्त ठेवण्याची मागणी केली गेली आहे.

अशा परिस्थितीत, मे 2027 या डेडलाईनवर कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी लक्ष ठेवून असून आयोग आपल्या शिफारसी सादर करेपर्यंत आणि सरकार अंतिम निर्णय घेईपर्यंत वेतनवाढ किंवा विशिष्ट अंमलबजावणीच्या तारखेबद्दलचे दावे केवळ अटकळच राहतील.