Headlines

8th Pay Commission Latest News; 18000 हजारांची बेसिक सॅलरी होणार 69000 रुपये? लवकरच होणार मोठा निर्णय; कधी येणार रिपोर्ट? जाणून घ्या टाइमलाइन


8th CPC Latest Update: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनर्स आठव्या वेतन आयोगाशी संबंधित नवीन माहितीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता, 8व्या वेतन आयोगाने केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांतील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटना, महासंघ आणि युनियन्ससोबतच्या बैठकांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. तसेच वेतन आयोगाचा अंतिम अहवाल कधी प्रसिद्ध होईल याबाबतही संभाव्य तारीख समोर आली आहे.

8th Pay Commission Latest Update
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
8th Pay Commission Updates: आठव्या वेतन आयोगाला देशभरातील 1 कोटींहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक संघटनांकडून मोठ्या संख्येने निवेदने सादर केली गेली आहेत. वेतन आयोगाने सरकारला आपला अहवाल सरकार करण्यास अद्याप 10 महिने शिल्लक असताना वेगवेगळ्या संघटनांकडून आयोगाला आधीच अनेक प्रस्ताव सादर केले आहेत.

नोव्हेंबर 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 8व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली गेली. माजी AIS अधिकारी पंकज जैनही या आयोगाचे सदस्य असून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य प्राध्यापक पुलक घोष देखील या समितीच्या सदस्यांपैकी आहेत.

Maharashtra Times8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात अपेक्षेप्रमाणं पगार वाढणार का? 5 प्रमुख घटक कर्मचाऱ्यांचा पगार अन् पेन्शन वाढीचा हिशोब ठरवणार

8व्या वेतन आयोगासमोरील मागण्या कोणत्या?

  • कर्मचारी संघटनांची आयोगासमोरील एक प्रमुख मागणी म्हणजे विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणींचे एकत्रीकरण करणे. विशेषतः, प्रतिनिधींच्या लेव्हल 2, 3, स्तर 4 आणि 5, स्तर 7 आणि 8, तसेच स्तर 9 आणि 10 चे विलीनीकरण करण्याचाही प्रस्ताव दिला गेला आहे. वेगवेगळ्या स्तरांवरील वेतनश्रेणी एकत्र केल्याने कर्मचाऱ्यांमधील विषमता दूर होऊ शकते, असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.
  • सध्याच्या लेव्हल 5 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी लेव्हल 6 मध्ये श्रेणी सुधारित करण्याचीही संघटनांनी मागणी केली आहे. केंद्रीय सचिवालय, रेल्वे, संरक्षण आणि टपाल सेवा यांसारख्या विभागांमधील मोठ्या संख्येने गट ‘क’ कर्मचारी दीर्घकाळापासून लेव्हल 5 वर अडकले, ज्यामुळे जुन्या प्रणालीअंतर्गत त्यांच्या करिअरमधील प्रगतीच्या संधींना बाधा येत असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
  • देशातील नियोक्त्यांच्या सर्वात मोठ्या प्रतिनिधी संस्थांपैकी NC-JCM ने सादर केलेल्या निवेदनानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे बेसिक पे 18000 रुपयांवरून 69000 रुपयांची वाढवण्याची मागणी केली आहे. म्हणजे, यानुसार फिटमेंट फॅक्टर किमान 3.83 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला गेला तर, सध्याच्या 3 टक्क्यांऐवजी 6% वार्षिक वाढीची मागणीही केली आहे.
  • याशिवाय प्रोव्हिडंट फंड (EPF) काढण्यात सुलभता, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी दाव्यांचे जलद निराकरण आणि कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांसाठी उत्तम जीवन विमा संरक्षणाची मागणीही जोर धरू लागली आहे.

Maharashtra TimesAdani Airlines: विमानतळ व्यवस्थापनानंतर आता थेट एअरलाइन्समध्ये अदानींची उडी! इंडिगो, एअर इंडियाची मक्तेदारी संपवणार?

वेतन आयोगाच्या नव्या बैठकांचे वेळापत्रक जाहीर

8 व्या केंद्रीय वेतन आयोगाने दिल्लीस्थित केंद्रीय कर्मचारी संघटना, महासंघ आणि युनियन यांच्यासोबत चर्चेसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. चर्चेची पुढील फेरी ऑगस्ट महिन्यात नवी दिल्लीत होणार असून यामुळे कर्मचारी संघटना आणि इतर हितधारकांना मागण्या व सूचना मांडण्याची आणखी एक संधी मिळू शकेल.

आठव्या वेतन आयोगाने 7 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट रोजी दिल्लीत स्थित किंवा नोंदणीकृत असलेल्या कर्मचारी संघटनांना आयोगासोबत चर्चेसाठी आमंत्रित केले असून याआधी कोलकाता येथे 9 आणि 10 जुलै रोजी बैठक पार पडलेली तर, येत्या काही महिन्यांत देशभरातील इतर राज्यांतील संघटनांसोबतही चर्चेसाठी वेळ दिला जाईल.

Maharashtra TimesPakistan Cash Crunch Crisis: इराणसोबत चर्चा घडवून दिली आता 96000 कोटी द्या! पाकिस्तानने अमेरिकेसमोर पुन्हा हात पसरवले

वेतन आयोगाचा अंतिम अहवाल कधी प्रसिद्ध होणार?

डिसेंबर 2026 पर्यंत वेतन आयोगाने आपला अहवाल सादर करण्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मात्र, जून-जुलै 2027 पर्यंत अंतिम अहवालासाठी मुदत दिली गेली आहे. 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिल्यावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आधी अंतरिम अहवाल प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतर आयोगाच्या स्थापनेच्या तारखेपासून 18 महिन्यांत अंतिम अहवाल प्रसिद्ध करण्याचे संकेत दिले होते.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा