8th Pay Commission HRA Hike: आठवा वेतन आयोग सध्या केंद्र सरकारच्या सुमारे 1.1 कोटी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या पगार व भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची कवायत करत आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा घरभाडे भत्ता थेट बेसिक सॅलरीशी लिंक्ड असतो, त्यामुळे फिटमेंट फॅक्टरमध्ये होणाऱ्या कोणत्याही वाढीचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मासिक भत्त्यात लक्षणीय बदल करू शकते.

आठव्या वेतन आयोगाने अद्याप फिटमेंट फॅक्टरबद्दल कोणताही अंतिम निर्णय घेतलेला असून वेगवेगळ्या गुणकांनुसार केलेल्या अंदाजांवरून वेतन स्तर 14, 15 आणि 16 मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात लक्षणीय बदल होताना दिसून येत आहे.
घरभाडे भत्ता किती वाढणार?
आठव्या वेतन आयोगात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त घरभाडे भत्ता वाढण्याची शक्यता आहे. यामागचे कारण म्हणजे की, घरभाडे भत्ता थेट मूळ पगाराशी जोडलेला असतो आणि नवीन वेतन आयोगामुळे बेसिक सॅलरीत मजबूत वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे घरभाडे भत्त्याची गणना मूळ पगाराच्या आधारावर केली जाते. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत 2.0, 2.28 आणि 2.57 यासारख्या विविध फिटमेंट फॅक्टर्सवर विचार केला जात आहे.
उदाहणार्थ Level-1 च्या एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार सध्या 18000 रुपये आहे आणि आठव्या वेतन आयोगात 2.0 फिटमेंट फॅक्टर निश्चित केला गेला तर, बेसिक पगार 36000 रुपयेपर्यंत वाढेल. यासह घरभाडे भत्ताही पूर्वीच्या 5400 रुपयांवरून 10800 रुपयेपर्यंत वाढेल.
त्याचप्रमाणे, Level-1 कर्मचाऱ्यांना 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास मूळ पगार थेट 18,000 रुपयांवरून 46,260 रुपयांपर्यंत वाढेल आणि घरभाडे भत्ता 13,880 रुपयांपर्यंत वाढेल. त्याचप्रमाणे X-श्रेणीच्या शहरांसाठी लेव्हल-10 कर्मचाऱ्यांचा HRA दरमहा 43,250 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. X-श्रेणीतील शहरांमध्ये घरभाडे भत्ता 36% पर्यंत वाढवण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
फिटमेंट फॅक्टर इतका महत्त्वाचा का?
फिटमेंट फॅक्टर एक असा गुणांक आहे, जो नवीन वेतन आयोगाअंतर्गत सुधारित मूळ वेतनाची गणना करण्यासाठी वापरला जातो. उच्च गुणक म्हणजे उच्च वेतन आणि परिणामी, मूळ वेतनाशी निगडित भत्त्यांमध्ये वाढ. अनेक कर्मचारी संघटनांनी सुमारे 2.57 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली, तर सरकार यापेक्षा कमी आकड्याला सहमती देण्याचा अनेक विश्लेषकांचा अंदाज आहे. विविध अहवालांमध्ये 2.0 ते 2.57 पर्यंत अनेक शक्यतांवर चर्चा झाली तरीही अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
Ancestral vs Self-Acquired Property Rights: पालकांच्या मालमत्तेवर मुलगा-मुलीला सरसकट अधिकार नाही, कायद्यानुसार राहू शकतात वंचित; जाणून घ्या सविस्तर
त्याचप्रमाणे, ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज असोसिएशन आणि इतर संघटनांनी म्हटले आहे की, मुंबई आणि दिल्ली-एनसीआर यासारख्या महानगरांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या घर भाड्याच्या तुलनेत सध्याचे HRA दर खूप कमी आहेत. अशा स्थितीत, सध्याचे घरभाडे भत्त्याचे दर X-श्रेणी शहरांसाठी मूळ वेतनाच्या 36%, Y-श्रेणी शहरांसाठी 24% आणि X-श्रेणी शहरांसाठी 12% पर्यंत वाढवण्याची मागणी केली जात आहे. इतकेच नाही तर, काही संघटनांनी X-श्रेणी शहरांसाठी घरभाडे भत्ता 40% पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.

