8th Pay Commission Increment Calculator Update 3 August: वार्षिक पगारवाढीमुळे केवळ कर्मचाऱ्यांच्या पैसाच वाढत नाही तर, इतर अनेक भत्त्यांमध्ये चक्रवाढ लाभही मिळतात. महागाई भत्ता किंवा DA आणि घरभाडे भत्ता (HRA) यांचे कॅलक्युलेशन कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या टक्केवारीनुसार केली जाते. म्हणजे मूळ पगार जितका जास्त तितकाच तुमचा महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता आपोआप वाढेल.

नवीन वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये फिटमेंट फॅक्टर सर्वाधिक चर्चेचा विषय असला तरी, केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारी कर्मचाऱ्यांचा पगार ठरवण्यात वार्षिक वेतनवाढीचा दर देखील खूप महत्त्वाची भूमिका बजावेल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती वार्षिक इन्क्रीमेंट मिळणार?
आतापर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातून वार्षिक बेसिक पगाराच्या 3 टक्के वेतनवाढ मिळते. पण, आठव्या वेतन आयोगाला वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांनी वार्षिक 5%, 6% किंवा 7% पर्यंत वेतनवाढ देण्याची मागणी केली आहे. अशाप्रकारे, कर्मचारी संघटनांची मागणी मान्य केली आणि 3%, 5% किंवा 6% वार्षिक वेतनवाढ दिल्यास पुढील 5 वर्षांत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात किती वाढ होऊ शकते याबाबत अंदाजित आकडेवारी पाहूया.
Gold Silver Price August 2026: सराफा बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गोल्ड शॉक! ट्रम्प यांच्या घोषणेनंतर सोन्याचे दर भडकले, चांदीचेही भाव वाढले
कर्मचारी संघटनांनी सादर केलेले प्रस्तावित वार्षिक वेतनवाढीचे दर
| संघटना/युनियन | प्रस्तावित वार्षिक वेतनवाढ |
|---|---|
| संयुक्त सल्लागार यंत्रणेची राष्ट्रीय परिषद (NC-JCM) | 6% |
| अखिल भारतीय संरक्षण कर्मचारी महासंघ (AIDEF) | 6% |
| राष्ट्रीय टपाल संघटना महासंघ (FNPO) | 6% |
| अखिल भारतीय नवीन पेन्शन योजना कर्मचारी महासंघ (AINPSEF) | 7% |
| भारतीय रेल्वे पर्यवेक्षक संघटना (IRTSA) | 5% |
7व्या वेतन आयोगाच्या मॅट्रिक्सवर आधारित BankBazaar.com ने वेतनाचे अंदाज तयार केले आहेत, ज्यामध्ये पाच वर्षांच्या कालावधीसाठी 3%, 5% आणि 6% वार्षिक वेतनवाढीची तुलना केली गेली आहे. खाली दिलेले कॅलक्युलेशन केवळ उदाहरणादाखल दिलेले अंदाज आहेत आणि आयोगाच्या शिफारसी नाहीत.
New Stock Market Timings: सोमवारपासून मार्केटची वेळ वाढणार! आता 3.30 ऐवजी शेअर बाजार 3:40 वाजता बंद होणार; क्लोजिंग ऑक्शन सेशनचे नवीन नियम जाणून घ्यालेव्हल 1 पगार वाढीचा क्रम
| वर्ष | 3% वार्षिक वेतनवाढ | 5% वार्षिक वेतनवाढ | 6% वार्षिक वेतनवाढ |
|---|---|---|---|
| सुरुवातीचे बेसिक पगार | 18,000 रुपये | 18,000 रुपये | 18,000 रुपये |
| 1 वर्ष | 18,500 रुपये | 18,900 रुपये | 19,100 रुपये |
| 2 वर्ष | 19,100 रुपये | 19,800 रुपये | 20,200 रुपये |
| 3 वर्ष | 19,700 रुपये | 20,800 रुपये | 21,400 रुपये |
| 4 वर्ष | 20,300 रुपये | 21,900 रुपये | 22,700 रुपये |
| 5 वर्ष | 20,900 रुपये | 23,100 रुपये | 24,200 रुपये |
लेव्हल 2 पगार वाढीचा क्रम
| वर्ष | 3% वार्षिक वेतनवाढ | 5% वार्षिक वेतनवाढ | 6% वार्षिक वेतनवाढ |
|---|---|---|---|
| सुरुवातीचे बेसिक पगार | 19,900 रुपये | 19,900 रुपये | 19,900 रुपये |
| 1 वर्ष | 20,500 रुपये | 21,100 रुपये | 21,100 रुपये |
| 2 वर्ष | 21,100 रुपये | 22,400 रुपये | 22,400 रुपये |
| 3 वर्ष | 21,700 रुपये | 23,800 रुपये | 23,800 रुपये |
| 4 वर्ष | 22,400 रुपये | 25,200 रुपये | 26,000 रुपये |
| 5 वर्ष | 23,100 रुपये | 26,800 रुपये | 27,600 रुपये |
लेव्हल 3 पगार वाढीचा क्रम
| वर्ष | 3% वार्षिक वेतनवाढ | 5% वार्षिक वेतनवाढ | 6% वार्षिक वेतनवाढ |
|---|---|---|---|
| सुरुवातीचे बेसिक पगार | 21,700 रुपये | 21,700 रुपये | 21,700 रुपये |
| 1 वर्ष | 22,400 रुपये | 22,800 रुपये | 23,100 रुपये |
| 2 वर्ष | 23,100 रुपये | 22,400 रुपये | 24,500 रुपये |
| 3 वर्ष | 23,800 रुपये | 25,100 रुपये | 26,000 रुपये |
| 4 वर्ष | 24,500 रुपये | 26,300 रुपये | 27,600 रुपये |
| 5 वर्ष | 25,200 रुपये | 27,700 रुपये | 29,100 रुपये |
अशाप्रकारे, वरील कॅलक्युलेशनवरून जितका जास्त बेसिक पगार तितका जास्त वार्षिक वेतनवाढीतून मिळणारे आर्थिक लाभ वाढेल हे स्पष्ट होते. तसेच लक्षात घ्या की मासिक मूळ वेतन वाढवण्याव्यतिरिक्त उच्च वेतनवाढीमुळे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, NPS योगदान आणि सेवानिवृत्ती लाभांनाही चालना मिळेल, तसेच भविष्यातील वेतन सुधारणांमध्ये संभाव्यतः पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

