Headlines

6500mAh बॅटरीचा Vivo T5 Lite 5G खरेदी करा 1500 रुपयांच्या झटपट डिस्काउंटसह। Maharashtra Times


गेल्या आठवड्यात लाँच झालेल्या Vivo T5 Lite 44W 5G स्मार्टफोनची पहिली अधिकृत सेल आज (22 जुलै) पासून फ्लिपकार्टवर सुरू झाली आहे. 20 ते 25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवा 5G फोन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यात आणखी काय खास असणार आहे, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Vivo T5 Lite 5G । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आधी वाचा. 6500mAh ची मोठ्या बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या या फोनवर कंपनीने पहिल्या दिवशी 1500 रुपयांचा थेट बँक डिस्काउंट जाहीर केला आहे. ग्राहकांना हा विशेष लॉन्च ऑफरचा फायदा फक्त आजच्या एका दिवसासाठीच घेता येणार आहे.

विवोचा हा नवीन स्मार्टफोन गेल्या आठवड्यात (16 जुलै) भारतीय बाजारात लाँच करण्यात आला आहे आणि आजपासून (22 जुलै) फ्लिपकार्टवर या मिड-रेंज स्मार्टफोनची विक्री सुरू झाली आहे. सेलच्या पहिल्या दिवशी अॅक्सिस, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे 1500 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. ही ऑफर केवळ 1 दिवसासाठी आहे.

Vivo T5 Lite 5G किंमत किती

या फोनचे दोन व्हेरिएंट आहेत, वेव्ह ब्लू आणि ट्वायलाइट शॅडो. 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19 हजार 999 रुपये, 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 21 हजार 999 रुपये, 6 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे.

कंपनीच्या अधिकृत साइटव्यतिरिक्त फ्लिपकार्ट आणि सर्व भागीदार रिटेल स्टोअर्सवर फोनची विक्री सुरू झाली आहे. या प्राइस रेंजमध्ये, Vivo चा लेटेस्ट मोबाइल फोन Motorola G57 Power 5G, REDMI Note 15 SE 5G आणि Realme P4x 5G सारख्या स्मार्टफोन्सना कडवी टक्कर देतो.

Vivo T5 Lite स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन: फोनमध्ये 6.74 इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे, हा फोन 1200 निट्स पीक ब्राइटनेस, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि डोळ्यांचे संरक्षण यासारख्या अनेक खास फीचरनी सुसज्ज आहे.
  • बॅटरी क्षमता: फोनमध्ये 6500 एमएएच बॅटरी आहे जी 44 W फास्ट चार्जला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, या हँडसेटची बॅटरी 38 मिनिटांत 1 ते 50 टक्के चार्ज होईल. हा फोन रिव्हर्स वायर्ड चार्जला देखील सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर: Vivo T5 Lite 5G मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी MediaTek Dimensity 6300 5G चिपसेट आहे.
  • AI फीचर्स: फोनमध्ये एआय कॅप्शन, एआय क्रिएशन आणि गुगल जेमिनी यासारखे अनेक आश्चर्यकारक एआय फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय फोनमध्ये विवो डॉक मास्टर आणि प्रायव्हेट स्पेस सारखे फीचर्स देखील उपलब्ध असतील.
  • कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील पॅनेलमध्ये 50-मेगापिक्सलचा IMX852 प्रायमरी सेन्सर आणि 0.08-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा