सॅमसंगने आपल्या नवीन Samsung Galaxy A27 स्मार्टफोनच्या लाँचनंतर आता त्याची भारतातील किंमत आणि ऑफर्स जाहीर केल्या आहेत. हा फोन पुढील महिन्यापासून तीन आकर्षक रंगांमध्ये आणि तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. यामध्ये शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 6 सिरीज प्रोसेसर आणि 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.चला तर मग याविषयी जाणून घेऊया.

हा स्मार्टफोन तरुण युजर्सचा विचार करून डिझाइन करण्यात आला आहे, जे विश्वासार्ह कार्यक्षमता, दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट, प्रबळ सुरक्षा आणि सोपा व सुटसुटीत सॉफ्टवेअर अनुभव देणाऱ्या डिवाईसच्या शोधात असतात. या स्मार्टफोनमध्ये स्टाइल, कार्यक्षमता आणि किफायतशीरपणाचे उत्तम संयोजन आहे.
गेमिंगचा सलग अनुभव मिळतो
Samsung Galaxy A27 मध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेली 6.7 इंच सुपर एएमओएलईडी स्क्रीन दिली आहे, जी आकर्षक रंगसंगती आणि स्मूथ व्हिज्युअल्ससह उत्कृष्ट टच रिस्पॉन्स देते. याच्या इन्फिनिटी-ओ डिस्प्लेमधील पंच-होल डिझाइनमुळे व्हिडिओ पाहण्याचा आणि गेमिंगचा सलग अनुभव मिळतो. तसेच, स्क्रीनच्या अधिक मजबूतीसाठी यात कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस+ चे संरक्षण देण्यात आले आहे.
4nm स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर
Samsung Galaxy A27 मध्ये ऊर्जा-कार्यक्षम 4nm स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर देण्यात आला असून, त्याला यूएफएस 3.1 स्टोरेज आणि एलपीडीडीआरएक्स5 रॅमची जोड दिली आहे. यातील सुधारित जीपीयू स्पीडमुळे गेमिंग ग्राफिक्स अधिक स्मूथ दिसतात. ही हाय-स्पीड मेमरी जलद डेटा ट्रान्सफर आणि उत्तम बॅटरी कार्यक्षमता सुनिश्चित करते, ज्यामुळे मल्टिटास्किंग, इंटरनेट ब्राउझिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग, एआय ॲप्लिकेशन्स आणि गेम्स खेळताना जलद आणि विश्वासार्ह कार्यक्षमता मिळते.
12 मेगापिक्सलचा एचडीआर पोर्ट्रेट कॅमेरा
Samsung Galaxy A27 मध्ये iOS आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 300 डीपीआय फोटो काढू शकणारा 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. तसेच, फ्रंटमध्ये उच्च दर्जाच्या व्हिडिओ कॉल्ससाठी 12 मेगापिक्सलचा एचडीआर पोर्ट्रेट कॅमेरा मिळतो. यातील AI-सक्षम टूल्समुळे कॅमेरा अनुभव अधिक प्रगत होतो, ज्यामध्ये फोटोमधील नको असलेल्या गोष्टी हटवण्यासाठी ‘ऑब्जेक्ट इरेझर’, सर्वोत्तम एडिटिंग सुचवणारे ‘एडिट सजेशन्स’ आणि फोटोंवर आवडीची स्टाइल लागू करण्यासाठी ‘माय फिल्टर’ या फीचर्सचा समावेश आहे.
22 भाषांमध्ये रिअल-टाइम व्हॉईस ट्रान्सक्रिप्शन
Samsung Galaxy A27 मधील ‘सर्च विथ गुगल’ फीचर्स एकाच वेळी अनेक गोष्टी ओळखू शकते, तर मिटिंगच्या नोट्स सोप्या करण्यासाठी व्हॉईस रेकॉर्डर ॲप 22 भाषांमध्ये रिअल-टाइम व्हॉईस ट्रान्सक्रिप्शन प्रदान करते. उत्तम अनुभवासाठी यात गुगल जेमिनाय आणि परप्लेक्सिटी सारखे AI असिस्टंट गॅलेक्सी ॲप्समध्ये खोलवर समाविष्ट केले आहेत, तर बिक्सबी नैसर्गिक भाषेतील कमांड्सद्वारे फोन सेटिंग्स नियंत्रित करतो. याशिवाय, AI-सक्षम ‘लाइव्ह ट्रान्सक्रिप्शन’ हे फीचर व्हॉईसमेल आणि फोन कॉल्स एकाच वेळी इंग्रजी, हिंदी व गुजराती भाषेत स्क्रीनवर लिखित स्वरूपात सादर करते.
Samsung Galaxy A27 मध्ये फास्ट-चार्जिंग सपोर्ट असलेली 5000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे, जी दिवसभर चालते. सुरक्षेसाठी यात सॅमसंग नॉक्स आणि नॉक्स व्हॉल्टचे हार्डवेअर-आधारित संरक्षण आहे, ज्यामुळे वैयक्तिक डेटा आणि कागदपत्रे सुरक्षित राहतात. यात सॅमसंग वॉलेटद्वारे टॅप अँड पे, यूपीआय पेमेंट आणि डिजिटल आयडी सुरक्षितपणे स्टोअर करण्याची सुविधा मिळते. तसेच, सॅमसंग या फोनसाठी 6 अँड्रॉइड ओएस अपग्रेड्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे.
Samsung Galaxy A27 5G स्मार्टफोन 3 जुलैपासून लाइट ग्रीन, लाइट पिंक आणि ब्लॅक या तीन रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन तीन वेगवेगळ्या स्टोरेज पर्यायांमध्ये येतो, ज्यामध्ये 6 GB रॅम + 128 GB व्हेरियंटची नेट इफेक्टिव्ह प्राईस 28,999 रुपये आहे, 8GB रॅम + 128 GB व्हेरियंटची किंमत 31,999 रुपये आहे, आणि 8GB रॅम + 256 GB या टॉप व्हेरियंटची किंमत 37,499 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
ग्राहक हा फोन सॅमसंग एक्सक्लुझिव्ह आउटलेट्स, पार्टनर स्टोअर्स, सॅमसंगडॉटकॉम आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनच्या सर्व मॉडेल्सवर बँक कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट केल्यास 3,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळेल. याशिवाय, निवडक नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपन्यांद्वारे 15 महिन्यांपर्यंतच्या झिरो डाउन पेमेंट ईएमआयचा किंवा 8 महिन्यांच्या डाउन पेमेंटसह 24 महिन्यांच्या EMI योजनेचा लाभ घेता येईल.

