Headlines

221 टार्गेट, शेवटच्या षटकात 16 धावा; माहीच्या टीममधील फलंदाजाचा पीचवरच ‘ओम नमः शिवाय’चा जप, पुढं चमत्कार घडला


Vansh Bedi Batting Video : दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सेंट्रल दिल्ली किंग्सने २२१ धावांचे आव्हान पार करत ऐतिहासिक विजय मिळवला. शेवटच्या षटकात १६ धावांची गरज असताना फलंदाजाने असं काही केलंय ज्याची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

Vanshi Bedi Om Namah Shivay Batting Video
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात कधी काय घडेल याचा काहीच नेम नसतो. टी-२० क्रिकेटमध्ये तर सामन्याचे पारडे कोणत्याही क्षणी कुठेही फिरू शकते. याचाच प्रत्यय काल झालेल्या दिल्ली प्रीमियर लीगच्या एका अत्यंत थरारक आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात आला. सेंट्रल दिल्ली किंग्स आणि दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स या दोन तुल्यबळ संघांमध्ये झालेल्या या लढतीत सेंट्रल दिल्ली किंग्सने ऐतिहासिक विजय नोंदवला. दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने विजयासाठी ठेवलेले २२१ धावांचे डोंगराएवढे आणि अशक्यप्राय वाटणारे आव्हान सेंट्रल दिल्लीने लीलया पार केले. या ऐतिहासिक विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो युवा फलंदाज वंश बेदी .

विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांचा थरार

सामन्याची सुरुवात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सच्या धडाकेबाज फलंदाजीने झाली. त्यांनी २० षटकांत धावांचा डोंगर उभा करत सेंट्रल दिल्लीसमोर २२१ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सेंट्रल दिल्ली किंग्सची सुरुवात चांगली झाली, तरी मोक्याच्या क्षणी त्यांनी काही विकेट्स गमावल्या. दक्षिण दिल्लीच्या अंशुलमन हुडाने भेदक गोलंदाजी करत तीन गडी बाद केले आणि सामन्यात रंगत निर्माण केली. सामन्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात सेंट्रल दिल्लीचा संघ अडचणीत सापडला होता. विजयासाठी शेवटच्या षटकात तब्बल १६ धावांची गरज होती आणि दडपण प्रचंड वाढले होते.

Maharashtra Timesनादखुळा! वैभव सूर्यवंशीनंतर आणखी दोन तोडफोड फलंदाजांची चर्चा, 28 आणि 34 चेंडूत मिळून 159 धावा; पाहा नेमके कोण?

अशा अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत वंश बेदीने क्रीझवर पाय रोवले. यावेळी त्याने ‘ओम नमः शिवाय’चा जप करत स्वतःला शांत ठेवले आणि गोलंदाजांवर अक्षरशः तांडव घालून. अत्यंत संयम आणि आक्रमकतेचा सुरेख मेळ घालत त्याने पाहिजे असलेल्या धावा कुटल्या आणि संघाला १९.४ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात २२२ धावांपर्यंत पोहोचवत अविश्वसनीय विजय मिळवून दिला.

कोण आहे वंश बेदी?

या एकाच खेळीने संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेणारा वंश बेदी मूळचा उत्तराखंडमधील अल्मोरा येथील रहिवासी आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याने क्रिकेटमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करतो आहे. अतिशय आक्रमक फलंदाजी आणि दबावाच्या परिस्थितीतही शांत डोक्याने खेळण्याची त्याची शैली अनेकांना प्रभावित करून गेली आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा नवा हुकमी एक्का

दिल्ली प्रीमियर लीगमधील त्याच्या याच सातत्यपूर्ण आणि स्फोटक कामगिरीची दखल घेत, आयपीएल २०२५ च्या लिलावात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझीने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले होते. सीएसकेनेहमीच युवा आणि गुणवान खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखली जाते. वंशमधील हीच चमक ओळखून त्यांनी त्याला संघात घेतले आहे. आजच्या या खेळीने सीएसकेचा निर्णय किती सार्थ होता, हेच त्याने दाखवून दिले आहे. त्याच्या या अप्रतिम कामगिरीमुळे आता त्याच्याकडे भारतीय क्रिकेट संघाचा भावी स्टार खेळाडू म्हणून पाहिले जात आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा