सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश:पक्षातून आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिलेत- बावनकुळे, असे अनेक धक्के पचवले, सचिन अहिर काही 'मास लीडर' नाहीत- राऊत
विधान परिषद उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. ठाकरे गटाचे वरळीतील आमदार सचिन अहिर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत उपसभापतीपदासाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या धक्कादायक घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरांच्या अहंकारामुळेच पक्ष संपत चालला असून, आता पक्षातून केवळ आदित्य…
