अंजनगाव सुर्जीमध्ये कृषी गोडाऊन, दारूचे दुकान फोडले:चोरटे सीसीटीव्हीत कैद, रोकडसह खत-कीटकनाशके लंपास
अंजनगाव सुर्जी शहरातील आठवडी बाजार परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री रोहित ॲग्रो एजन्सीचे कृषी गोडाऊन आणि शेजारील देशी दारूचे दुकान फोडले. ही घटना आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरी करणारे दोन अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या…
