Headlines

भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे उघड:100 रुपयांचे चिंचोके विकले लाखोंना, भक्तांच्या पॅन-आधारचा गैरवापर करून उघडली बोगस खाती!

स्वतःला साक्षात महादेवाचा अवतार आणि ‘कॅप्टन’ म्हणवून घेत भाविकांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोककुमार एकनाथ खरात याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. सुमारे 42 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने खरातविरोधात आरोपपत्र दाखल केले असून, तपासादरम्यान त्याचे अनेक धक्कादायक आणि हादरवणारे कारनामे समोर आले आहेत. अंधश्रद्धेचा फायदा घेत त्याने भाविकांची केवळ आर्थिक लूटच केली…

Read More

केसरीत भव्य मोफत आरोग्य शिबिर संपन्न

सावंतवाडी प्रतिनिधी : घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने केसरी येथील ग्लोबल एक्वेरियम येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा परिसरातील अनेक नागरिकांनी लाभ घेतला. शिबिरात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. त्यामध्ये डॉ. दत्तात्रय सावंत (बालरोगतज्ज्ञ), डॉ. सतीश सावंत (जनरल फिजिशियन), डॉ. विनय सूर्यवंशी (दंतचिकित्सक), डॉ. अभिजीत चितारी…

Read More

आपण माणसं राहिलो नाही, झोंबी झालो आहोत:विद्यार्थ्यांवरील लाठीमारानंतर अभिनेता समीर चौघुले संतापले, ट्रोलर्सनाही सुनावलं

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पाठिंबा मिळत आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईनंतर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते समीर चौघुले यांनी फेसबुकवर भावनिक आणि संतप्त पोस्ट लिहित विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भूमिका मांडली आहे. तरुण विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करत त्यांनी…

Read More

Pakistan $10 Billion Dollar Help; इराणसोबत चर्चा घडवून दिली आता 96000 कोटी द्या! पाकिस्तानने अमेरिकेसमोर पुन्हा हात पसरवले

Pakistan News: पाकिस्तान उगाच कोणाचं भलं करत नाही, सगळं स्वतःच्या फायद्यासाठी असतं जे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. अगदी इराण-अमेरिका युद्धातही पाकिस्तानने स्वतःच्या फायद्यासाठी मध्यस्थी केली आणि आता त्याची किंमत वसूल करणार आहे. इराण-अमेरिका युद्धात मध्यस्थाची भूमिका बजावून पाकिस्तान मूलतः एका ब्रोकरेजची भूमिका बजावत आहे. दहशतवादाला पोसणारा पाकिस्तान पश्चिम आशियातील युद्ध संपवण्यासाठी इतका आग्रही का…

Read More

Money Mule Scam :’म्युल’बँक खातेधारकांना फटका ;नाशिक जिल्ह्यात एक कोटी ५८ लाखांचे व्यवहार

Nashik Scam News :नाशिक जिल्ह्यात म्युल अकाउंट्सचे मोठे जाळे सायबर पोलिसांनी उघड केल.पोलिस ठाण्यात ९० बँक खातेदारांविरोधात एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.तर जिल्ह्यात एक कोटी ५८ लाखांचे व्यवहार झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी,नाशिक: ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमधील बेकायदेशीर रक्कम इतरत्र वळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल अकाउंट्स’चे नाशिक जिल्ह्यातील मोठे जाळे सायबर पोलिसांनी उघड केले…

Read More

Parliament Monsoon Session | NEET Paper Leak Controversy Kharge Statement

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी संसद भवन परिसरात एनडीए आणि विरोधक आमनेसामने आले. भाजपासह एनडीएच्या मित्रपक्षांच्या खासदारांनी मकर दरवाजासमोर राहुल गांधींविरोधात निदर्शने केली. ते 21 जुलै रोजी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर राहुल गांधींनी केलेल्या धरणे आंदोलनाचा निषेध करत आहेत. दुसरीकडे, इंडिया ब्लॉकच्या खासदारांनी नीट पेपरफुटी आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची…

Read More

किचनमधील झुरळं कशी घालवायची? बेकिंग सोड्याचा सोपा घरगुती उपाय

किचनमध्ये स्वयंपाक करताना अचानक एखादं झुरळ दिसणं ही अनेक घरांमधील सामान्य समस्या आहे. विशेषतः किचनच्या ट्रॉली, सिंकखालील जागा, कपाटांच्या कोपऱ्यात, गॅसच्या मागे किंवा अन्नपदार्थ ठेवलेल्या ठिकाणी झुरळं पटकन वाढतात. झुरळं केवळ त्रासदायक नसतात, तर ते अन्नपदार्थ दूषित करून आरोग्यासाठीही समस्या निर्माण करू शकतात. बाजारात झुरळांसाठी अनेक स्प्रे, जेल आणि केमिकल उपाय उपलब्ध आहेत. मात्र, काही…

Read More

मोदी म्हणाले- पेपर लीक केससाठी फास्ट ट्रॅक कोर्ट बनवू:राहुल म्हणाले- तुम्ही शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्यास जबाबदार

जंतर-मंतरवर सुरू असलेल्या पेपरफुटी प्रकरणावरील आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी X वर पोस्ट करून लिहिले की, पेपरफुटीच्या दोषींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट्स स्थापन केले जातील. देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडले जाणार नाही. यावर राहुल गांधींनी X वर पोस्ट करून म्हटले की, तुम्हीच तरुणांच्या…

Read More

एसी लोकलचे दरवाजे लॉक, ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड; कल्याण-CSMT लोकलमध्ये तांत्रिक बिघाड| Maharashtra Times

Kalyan-CSMT AC Local: दिवसेंदिवस एसी लोकलमधील तांत्रिक बिघाडांच्या घटना वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच लोकलमधील एसी अचानक बंद पडल्याने प्रवाशांचा श्वास कोंडला आता कल्याण रेल्वे स्थानकावर एसी लोकलचे काही दरवाजे बंद राहिल्याने गोंधळ उडाला. म.टा वृत्तसेवा, कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकातून सकाळी ८.५४ वाजता मुंबईच्या निघणाऱ्या वातानुकूलित (एसी) लोकलचे दरवाजे न उघडल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. एका…

Read More

आचरा ग्रामसभेत वीज बिले न भरण्याचा एकमुखी निर्णय

आचरा प्रतिनिधी : आचरा गावात सबस्टेशन असूनही सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचे पडसाद आचरा ग्रामसभेत उमटले. पत्र देऊनही ग्रामसभेत वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्याने ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी आचरा वीज वितरण कार्यालयातून सभेस हजर असलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत,”जोपर्यंत ग्राहकांना सुरळीत वीज मिळत नाही, तोपर्यंत एकही ग्रामस्थ वीजबिल भरणार नाही,” असे स्पष्ट केले. तसेच,…

Read More