Headlines

20,000 रुपयांच्या बजेटमध्ये मिळणारे 7 दमदार स्मार्टफोन, कॅमेरापासून परफॉर्मन्सपर्यंत फीचर्स एकदम भारी। Maharashtra Times


भारतीय मोबाईल मार्केटमध्ये 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत अनेक भन्नाट स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत, जे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. जर तुम्हाला बजेटमध्ये उत्तम कॅमेरा आणि हाय-स्पीड परफॉर्मन्स हवा असेल, तर बाजारात Realme P4R आणि Redmi Note 14 SE यांसारखे एकापेक्षा एक सरस 5G मोबाईल्सचे तगडे ऑप्शन्स पाहायला मिळतात. चला तर मग जाणून घेऊया.

Smartphones Under 20000। Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
सध्या 20 हजारांच्या बजेट श्रेणीमध्ये फ्लॅगशिप लेव्हलचे फीचर्स देणारे स्मार्टफोन धुमाकूळ घालत आहेत. कमी खर्चात उत्कृष्ट डिस्प्ले, वेगवान प्रोसेसर आणि दमदार बॅटरी बॅकअप देणाऱ्या टॉप-7 मोबाईल्सचा शोध येथे संपतो. तुमच्या पैशांची शंभर टक्के वसुली करणारे 2026 मधील सर्वोत्तम 5G फोन्स जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

20,000 पेक्षा कमी किंमतीचा फोन

20,000 पेक्षा कमी हा भारतीय बाजारपेठेतील एक अतिशय लोकप्रिय विभाग आहे. या रेंजमध्ये अनेक उत्तम स्मार्टफोन येत आहेत, जे मोठ्या बॅटरीपासून ते शक्तिशाली कॅमेऱ्यापर्यंत मिळतात.

Realme P4R 5G

Realme P4R हा कंपनीचा लेटेस्ट फोन आहे. या स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपयांपासून सुरू होते. यात फास्ट चार्जिंगसह सुसज्ज 8000mAh बॅटरी आहे. याशिवाय हँडसेटमध्ये 50MP कॅमेरा आणि MediaTek Dimensity 6300 चिपसेट मिळतो.

Redmi Note 14 Se 5G

रेडमीचा हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी 7025-अल्ट्रा प्रोसेसरसह येतो. या फोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. यात 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. याची बॅटरी 5110mAh आहे. हे अधिकृत वेबसाइटवरून 19,999 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

OPPO K14 5G

OPPO K14 5G फोन 19,999 रुपयांना उपलब्ध आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये 7000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यात 45 वॉट फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी 6300 चिपसेट आणि 128 GB स्टोरेज आहे. SD कार्डच्या मदतीने हे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. याचा कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे.

HMD Vibe2 5G

HMD Vibe2 13,999 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. याचा डिस्प्ले 6.75 इंचाचा आहे. फोटोग्राफीसाठी हँडसेटमध्ये 50 मेगापिक्सलचा बॅक आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Moto G96 5G

मोटोरोला या स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपये आहे. हा फोन अँड्रॉइड 15 आधारित ओएसवर काम करतो. फोनमध्ये 5500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस पोल डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 144 हर्ट्जचा आहे.

Vivo T4 Lite 5G

Vivo T4 Lite ची सुरुवातीची किंमत 14,999 रुपये आहे. या मोबाइल फोनमध्ये 1000 निट्स पीक ब्राइटनेसची स्क्रीन आहे. याची बॅटरी 6000 एमएएचची आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी 6300 5G प्रोसेसर मिळतो. याचा कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे.

Samsung Galaxy M17 5G

Samsung Galaxy M17 5G 6GB + 128GB स्टोरेज पर्यायासह 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.7 इंचाचा FHD+ Infinity-U सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात Exynos 1330 चिप आणि 5000mAh ची बॅटरी आहे. यात 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा