Headlines

11 year old girl repeatedly abused in mira bhayandar case revealed after pregnancy; ११ वर्षांच्या मुलीला अस्वस्थ वाटू लागलं, आईने तपासणीसाठी डॉक्टरकडे नेलं; रिपोर्ट येताच कुटुंब कोसळले


Mira Bhayandar News: आई कामाला गेल्यानंतर घरी एकट्या असलेल्या शाळकरी मुलीसोबत संतापजनक प्रकार घडला असून रुग्णालयातील तपासणीनंतर याबाबतचा उलगडा झाला आहे.

school girl news
११ वर्षांच्या मुलीला अस्वस्थ वाटू लागलं, आईने तपासणीसाठी डॉक्टरकडे नेलं; रिपोर्ट येताच कुटुंब कोसळले(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
भाविक पाटील, मिरा-भाईंदर: शाळेत जाण्याच्या व खेळण्या-बागडण्याच्या वयात एका अवघ्या ११ वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मिरा-भाईंदरमध्ये घडला आहे. पीडित मुलगी सहा महिने गर्भवती राहिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार नुकताच उघड झाला आहे. या घटनेमुळे मिरा-भाईंदर हादरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

पीडित मुलगी ही तिचे आई व दोन भावांसोबत भाईंदर पश्चिम परिसरात राहायला आहे. तिची आई मजुरी तर दोन भाऊ कामानिमित्त दररोज घराबाहेर जातात. ती शाळेत जाते आणि त्यानंतर एकटीच घरी असते. याचा गैरफायदा घेत, जवळच राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने पीडितेसोबत प्रथम ओळख निर्माण केली. त्यानंतर पीडितेच्या घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत ऑगस्ट महिन्यात प्रथम पीडितेला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून वारंवार त्याच्याकडून हे कृत्य सुरू होते. यानंतर काही दिवसांपूर्वीच पीडित मुलीला अस्वस्थ वाटत असल्याने पीडितेची आई मुलीला जवळच्या डॉक्टरकडे घेऊन गेली होती.

यावेळी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना लहानगी गर्भवती असल्यासारखे वाटले. मात्र त्यावर विश्वास बसत नसल्याने त्यांनी तिची सोनोग्राफी करण्यास सांगितले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर पीडित मुलगी ही सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. त्यानंतर पीडितेच्या आईने पीडितेकडे चौकशी केल्यानंतर तिने तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली होती. त्यावरून त्यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, याप्रकरणी आरोपीविरोधात पोस्को व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीची माहिती घेतली असता तो दोन महिन्यांपूर्वीच तो परदेशात गेला असल्याचे कळाले. या आरोपीला पुन्हा भारतात घेऊन येत त्याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा