Akash Ambani Ferrari Purosangue: आकाश अंबानींची फेरारी व्ही 12 इंजिन असलेली हाय-परफॉर्मेंस एसयूव्ही आहे, जीचा लुक फारच Attractive आहे. या कारचा टॉप-स्पीड 310 किमी/तासापेक्षा जास्त आहे.

आकाश अंबानी रेड कलरच्या Ferrari Purosangue मध्ये दिसले आहे. फेरारी व्ही 12 इंजिन असलेली हाय-परफॉर्मेंस एसयूव्ही आहे, जीचा लुक फारच Attractive आहे. या कारचा टॉप-स्पीड 310 किमी/तासापेक्षा जास्त आहे.
गेल्या वर्षी झाली लाँच
मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी 2024 मध्ये ही का इंडियन मार्केटमध्ये लाँच झाली. एसयूव्हीची किंमत 10 कोटी 50 लाख रुपये आहे. फेरारीच्या डिझाइन हायलाइट्सबद्दल बोलायचे झाल्यास, Ferrari Purosangue SUV मध्ये सिग्नेचर स्टाइलिंग आहे. जे सर्वांनाच आकर्षित करते.
फेरारी फीचर्स आणि इंजिन
या कारमध्ये एक लांब बोनट, स्लोपिंग रूफलाइन आहे. या कारचे एरोब्रिज डिझाइन, जे एफ 12 बर्लिनिटासारखेच आहे, ज्यामध्ये इलेक्ट्रिक रियर-हिंग्ड डोअर आहे.
काय आहे एसयूव्हीचा टॉप स्पीड?
फेरारीच्या पोरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, Ferrari Purosangue एसयूव्ही 6.5-लिटर व्ही 12 पेट्रोल इंजिन आहे, जे 725 एचपी पॉवर आणि 716 एनएम टॉर्क जनरेट आहे. हा एसयूव्ही केवळ 0-100 किमी/ता आणि फक्त 3.3 सेकंदात स्पीड पकडते. या व्यतिरिक्त, कारचा टॉप-स्पीड 310 किमी/ताशी आहे. फेरारी पुरोसंग्यू थेट लॅम्बोर्गिनी उरूसशी स्पर्धा करते.
आकाश अंबानी यांचे कार कलेक्शन
Ferrari Purosangue व्यतिरिक्त आकाश अंबांनीकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत, ज्यामध्ये लॅम्बॉर्गिनी उरुस मॅक्लेरेन, रोल्स रॉयल्स फँटम, फेरारी एस90 स्टारडेल, बेंटलीचा समावेश आहे.
आकाश अंबांनीच्या रोल्स रॉयस फँटम ड्रॉपहेड कूपची किंमत 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या लक्झरी कन्व्हर्टिबल सेडानमध्ये 6.75 लीटर V12 इंजिन आहे, जी 453 PS ची टॉप पॉवर आणि 720 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करते. ही रोल्स रॉयस कार केवळ 5.6 सेकंदात 0-100 किलोमीटर प्रतितास स्पीड पकडते

