Headlines

विजू मानेने घरातले दागिने गहाण ठेवून सिनेमा बनवलाय, आता ‘स्पायडरमॅन’ मुळे मराठी चित्रपटांना शो नाहीत; कुशल बद्रिकेची नाराजी


मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ‘ मामाच्या गोव्याला जाऊया ‘ या सिनेमाची चर्चा सुरू आहे. हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या सिनेमातील कलाकरांनी आणि दिग्दर्शक विजू माने यांनी या चित्रपटाबद्दल अनेक खास गोष्टी शेअर केल्या. या सिनेमासाठी दिग्दर्शक विजू माने यांनी त्यांच्या घरातील सगळे दागिने गहाण ठेवलेत, असा खुलासा एका मुलाखतीत करण्यात आलाय.

मामाच्या गोव्याला जाऊया‘साठी दिग्दर्शक विजू माने यांनी त्यांच्या घरातील स्त्रियांचे दागिने गहाण ठेवले आहेत, असा खुलासा सिनेमातील अभिनेता कुशल बद्रिकेनं केला.

घरातील दागिने गहाण ठेवून घेतले कर्ज…
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान कुशल बद्रिके यानं चित्रपटाबद्दल बोलताना मोठा खुलासा केला. याबद्दल बोलताना तो कमालीचा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

विजू माने सरांनी या चित्रपटासाठी स्वतःच्या घरातील सगळे दागिने… स्वतःच्या बायकोचे, बहिणीचे, आईचे आणि सासूबाईंचे अगदी खानदानातले सगळे दागिने गहाण ठेवले आहेत. त्यावर लोन (कर्ज) घेऊन त्यांनी हा चित्रपट पूर्ण केलाय. त्यामुळं आम्ही चित्रपटाला आई-बाप मानतो, म्हणूनच आज हा त्याग सर्वांसमोर सांगत आहोत, असं कुशलनं म्हटलं. ‘एबीपी माझा’ला मुलाखतीत दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

कुशलनं हा खुलासा केल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीसह प्रेक्षकांमध्येही चर्चा सुरू आहे. हा खूपच मोठा निर्णय असल्याचं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. आपल्या घरातील सर्व दागिने गहाण ठेवून हा सिनेमा उभा करण्यात आला. मात्र आता एका हॉलिवूड सिनेमासाठी मराठी सिनेमांना शो मिळत नसल्याचंही या कलाकरांनी सांगितलं.

‘स्पायडरमॅन’मुळे सिनेमाला शो नाहीत?
तर एखादा हॉलिवूड सिनेमा आला की, त्यामुळं प्रादेशिक सिनेमांना मोठा फटका बसतो. आताही बॉक्स ऑफिसवर असंच काहीसं चित्र आहे. ‘स्पायडरमॅन’मुळे ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या सिनेमाला अपेक्षित शो मिळत नसल्याचं कुशलनं सांगितलं. यावर त्यानं स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

Maharashtra TimesSaubhagyawati Sarpanch Review: हिंदीला वेब सीरिजला टक्कर देणारी ‘सौभाग्यवती सरपंच’
मराठी सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहेत. विनोद चांगला असेल तर, सिनेमा चांगला असेल तर १०० प्रेक्षक १०० टक्के तुमचा सिनेमा उचलून धरतात. पण त्यांना सिनेमा पाहायला ठिकाणचं उपलब्ध होत असेल तर ते तरी काय करणार? मेसेज बॉक्समध्ये अनेकांचे मेसेजे येतात की, सिनेमा पाहायला आहे, पण जवळच्या थिएटरमध्ये शो नाहीत.. प्रेक्षकांना सिनेमा पाहायचा आहे, पण त्यांना ठिकाण उपलब्ध होत नाही, हे मला पटतच नाही, असंही कुशलनं म्हटलं. हॉलिवूड सिनेमाचं तिकीट हे ७००-१५०० रुपयांपर्यंत असतं, तरी आम्हाला शो दिले जात नाहीत, अशीही खंत त्यानं व्यक्त केली.

Maharashtra TimesPriyanka Chatuvedi: आता समजलं की ‘रामायणम्’चा प्रोमो इतका वेळ लपवून का ठेवला, प्रियंका चतुर्वेदींची ट्रेलरवर प्रतिक्रिया चर्चेत
तगडी स्टारकास्ट
‘स्ट्रगलर्स साला’ या लोकप्रिय वेब सीरिजच्या १० वर्षांच्या प्रवासानंतर विजू माने हीच गँग घेऊन मोठ्या पडद्यावर आले आहेत. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटात दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे. कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण या तिघांसोबत आता अंकुश चौधरीही यांच्या ग्रुपमध्ये सहभागी झालाय. तर नेहा खान आणि रुचिरा जाधव यांच्याही सिनेमात मुख्य भूमिका आहेत. आज ३१ जुलै रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत