Headlines

वर्ल्ड कपमधून भारताचं पॅकअप; नक्की कुठे चुकलं? कॅप्टन हरमनप्रीत कौरने स्पष्ट शब्दात म्हणाली…


Harmanpreet Kaur News : रविवार प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यासाठी खराब गेला. महिला संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला तर दुसरीकडे पुरूष संघ आयर्लंडविरूद्ध टी-२० मालिका हरला. या सामन्यामध्ये झालेल्या पराभवानंतर कॅप्टन हरमनप्रीतने बोलताना मोठे विधान केले आहे.

Harmanpreet kaur
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : टी-२० वर्ल्ड कपमधून भारतीय महिला संघ बाहेर पडला. वनडे वर्ल्ड कपच्या विजेतेपदाची ट्रॉफी उंचावल्यावर आता टी-२० वर्ल्ड कपवरही नाव कोरण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरला होती. पण ऑस्ट्रेलियाने पराभूत केल्याने भारताचा प्रवास इथेच संपला. भारताने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत २० ओव्हरमध्ये १७०-४ धावा केल्या होत्या. या धावांचा ऑस्ट्रेलियाच्या संघाने कोणताही दबाव न घेता यशस्वीपणे पाठलाग केला. सलग दोन पराभवांमुळे भारताचा या वर्ल्ड कपमधील प्रवास लॉर्ड्सच्या ग्राऊंडवर संपला. पण सामना संपल्यावर कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने फक्त आजच्या पराभवाचंच नाहीतर संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये काय चुकलं आणि पुढे काय बदलण्याची गरज आहे यावर सविस्तर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

शेवटी आम्ही एक चांगली धावसंख्या उभारली होती, फलंदाजी करताना वाटत होते की माग आहोत पण शेवटच्या ओव्हरमध्ये ते अंतर भरून काढले होते. संपूर्ण स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर आमच्या संघाचे मोठ्या संघांविरूद्ध प्रदर्शन चांगले नव्हते झाले. अशा संघांविरूद्ध खेळताना तुम्हाला सर्वोत्कृष्ट प्रदर्शनाची गरज असते. ऑस्ट्रेलिया हा संघा दर्जेदार संघांपैकी एक असून त्यांनी त्यांच्या प्लॅनिंगनुसार गोलंदाजी केली, सामना चांगला झाला पण दुर्दैवाने आम्ही जिंकू शकलो नाही. या स्पर्धेत आम्ही आमच्या दर्जेनुसार खेळ केला नाही, एक संघ म्हणून पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे. खास करून मोठ्या संघांविरोधात कसे खेळायला हवे कारण यांच्याविरूद्ध आम्ही सामन्यात कायम असतो पण शेवटच्या काही ओव्हरमध्ये खूप धावा देतो किंवा आव्हानाचा पाठलाग करत असतो तेव्हा धावा काढता येत नाहीत हे खूप दिवसांपासून सुरू आहे, असं हरमनप्रीत कौर म्हणाली.
Maharashtra TimesIND vs IRE : अतिआत्मविश्वास नडला! आयर्लंडने वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाला हरवलं, 2-0 ने जिंकली मालिका
आजच्या सामन्यामध्ये पाहिलं असेल की स्मृती मानधना आण शफाली वर्मा यांनी सावध खेळ सुरू केला होता. आपल्या विकेट जाऊ दिल्या नाहीत. पण कुठेतरी पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांना गती द्यायला लागते ती त्यांनी द्यायला जमली नाही, आणि मोक्याच्या वेळी आऊट झाल्या. त्यानंतर जेमिमाहला पाठवलं पण तिनेही बॉल टू रन केल्याने भारतावरच कमी धावा झाल्याचा वाढलेला दबाव स्पष्टपणे दिसत होता. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये तिला रिटायर हर्ट करण्यात आलं. हा निर्णय जर १५व्या ओव्हरमध्ये घेतला गेला असता तर नक्कीत रिचा घोष हिने मोठे फटके मारून धावगती वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न केला असता. संघ व्यवस्थापनाने हा निर्णय घ्यायला उशिरा केला होता.
Maharashtra TimesIND W vs AUS W : याला म्हणतात कॅप्टन! हरमनप्रीतचा ऑस्ट्रेलियाला दणका, 25 चेंडूत फिफ्टी ठोकत महिला टी-20 विश्वचषकात पहिल्यांदाच…
दरम्यान, या सामन्यामध्ये हरमनप्रीत कौर हिने २५ चेंडूत ५० धावा करत वर्ल्ड कपमध्ये भारताकडून सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. याआधीसुद्धा हा विक्रम हरमनप्रीतच्या नावावरच होता, तिने २७ चेंडूत कामगिरी केली होती. आज पुन्हा एकदा तिने हा आपला विक्रम मोडित काढला.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा