Headlines

मला ड्रॉप करायचंय तर करा! लॉर्ड्सवरील शतकापूर्वी रोहित आणि निवडकर्त्यांमध्ये काय चर्चा? माजी क्रिकेटरने आतल्या गोष्टी फोडल्या


Mohammed Kaif On Rohit Sharma : रोहित शर्माच्या लॉर्ड्स मैदानावरील तडाखेबाज शतकानंतर त्याने टीकाकारांना तर जोरदार उत्तर दिलेच त्याशिवाय त्याने निवडकर्त्यांनाही थेट मेसेज दिला आहे. आपण स्वतः निवृत्त होणार नाही, असाच हा संदेश आहे, असं दिग्गज माजी क्रिकेटर म्हणाला आहे.

Rohit Sharma Lords Century 138
रोहित शर्मा लॉर्ड्स शतक
मुंबई : भारतीय क्रिकेट सध्या एका मोठ्या बदलांमधून जात आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माबाबतही याच काळात मोठ्या चर्चा घडून आल्या. त्याच्या काही मॅचमधील कामगिरीवरुन त्याच्यावर टीका सुरु झाली होती. पण त्याचवेळी त्याने भारत विरुद्ध इंग्लंडमधील शेवटच्या सामन्यात १३८ धावांची शानदार खेळी केली. त्याचे लॉर्ड्सवरील हे शतक ऐतिहासिक ठरले. त्यानंतर टीकाकारांचे तोंड बंद झाले. वनडेमध्ये भारतीय फलंदाजाने केलेले हे शतक पहिलेच शतर ठरले आहे. दरम्यान या शतकापूर्वी अनेक बातम्यांमध्ये सांगितले जात होते की, रोहित शर्माचा हा शेवटचा सामना ठरणार आहे. त्याशिवाय आगामी २०२७ च्या वर्ल्डकपसाठी बीसीसीआय आता नव्या फलंदाजांच्या शोधात आहे. त्यामुळे रोहितची निवृत्ती आता जवळपास निश्चित अशा प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या, पण रोहितने त्याच्या या तडाखेबाज खेळीतून सगळ्याच चर्चा फोल ठरवल्या.

रोहितने दिला बीसीसीआयला मेसेज

भारताचा माजी क्रिकेटर मोहम्मद कैफ याने या सगळ्याप्रकरणावर भाष्य केले आहे. त्याच्या म्हणण्यांनुसार रोहितने त्याच्या धमाकेदार शतकातून निवडकर्ते आणि टीम मॅनेजमेंटला एक थेट संदेश दिला आहे. त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील कार्यक्रमात बोलताना कैफ म्हणाला की, “रोहित शर्माने त्याच्या खेळीतून एक गोष्ट आता स्पष्ट केली आहे, ती म्हणजे की जर माझा खेळ चांगला होत नसेल तर तुम्ही निर्णय घ्या आणि मला ड्रॉप करा. त्याचा स्वतः सन्यास न घेणं, मैदानावरील त्याचा उत्साह आणि ज्या आक्रमक अंदाजात त्याने लॉर्ड्सवर शतक ठोकलं, त्यातून स्पष्ट होत आहे की त्याचे सर्व लक्ष फक्त आणि फक्त खेळावर आहे. त्यानंतरही जर निवडकर्त्यांना त्याच्याबद्दल काही निर्णय घ्यायचा असेल तर तो त्यांचा निर्णय असणार आहे”

Maharashtra TimesTanush Kotian : संधी हुकलेल्या फिरकीपटूचा मारा, श्रीलंका दौऱ्यासाठी फलंदाजांचा घोटून सराव, दोन धुरंधरांची वांद्य्रात प्रॅक्टिस

टीम मॅनेजमेंटकडून स्पष्टतेची गरज

कैफच्या मते रोहितबद्दल अनेक समज तयार झाले आहेत. त्याला खेळवायचे की नाही, त्याला निवृत्ती देण्यात येणार की नाही, याबद्दल कोणतीही स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने याची काळजी घ्यावी आणि स्पष्टता दाखवावी. कैफ पुढे म्हणाला की, “अनेकदा कोचिंग स्टाफमधील सदस्य सांगतात की आम्ही रोहितला नैसर्गिक खेळ खेळण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. पण कोणीच आतापर्यंत पुढे येऊन हे स्पष्ट केलं नाही, की रोहित शर्मा २०२७ चा वर्ल्डकप खेळणार आहे. यापद्धतीचे वक्तव्य कोणाकडूनही होणे हे खूप गरजेचे आहे. फॉर्म येईल जाईल, पण टीम मॅनेजमेंटला रोहितच्या पाठीशी मजबुतपणे उभे आहोत, असे सांगावे लागेल. याने फरक पडतो.”

Maharashtra TimesAuqib Nabi Selection : वेगवान गोलंदाजी नाही तर मग आकिब नबीची खरी ताकद नेमकी काय? इरफान पठाणने दिलं उत्तर

त्याने पुढे सांगितले की, अशा प्रकारचे कोणतेही कोणाचेही वक्तव्य समोर आलेले नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये अनेक संभ्रम तयार झाले आहेत. “बाहेरच्या लोकांना अंतर्गत घडामोडी काय सुरु आहेत, हे कसे समजणार? पण मला असं वाटतं की आता रोहितने स्वतः मनाची तयारी केली आहे, की तो मागे हटणार नाही.” त्यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे.