Headlines

भारत वि. झिम्बाब्वे टी-20 मॅच सुरू, 150 पेक्षा वेगाने टाकणाऱ्या बॉलरचा डेब्यू; कॅप्टन अय्यरला पहिल्या विजयाची आस


मुंबई : भारत आणि झिम्बाव्बेमधील पहिल्या टी-२० सामन्याचा टॉस झाला असून पुन्हा एकदा भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आहे. श्रेयसने पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला असून युवा खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली आहे. आज भारताकडून युवा खेळाडू गोलंदाजी विभाग पाहणार आहेत. आज प्लेइंग ११ अशोक शर्मा याला संधी मिळाली आहे. अशोक शर्मा हा १५० पेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करतो. आयपीएलमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीनंतर त्याला संघात स्थान मिळाले आहे. तर आता श्रीलंकेत पार पडलेल्या तिरंगी मालिकेत भारत अ संघाचे त्याने प्रतिनिधित्त्व केले होते.

आजच्या सामन्यामध्ये मयंक यादव,अशोक शर्मा आणि प्रिन्स यादव यांच्याकडे भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा असणार आहे. मयंक यादव दुखापतीनंतर परतला आहे. या सामन्यात रिंकू सिंग याने कमबॅक केले असून शिवम दुबेही आज खेळताना दिसणार आहे. त्यामुळे हर्ष दुबे याला संधी मिळाली नाही. अफगाणिस्तानविरूद्ध आपल्या फील्डिंग आणि स्पिन गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधले होते. स्पिन गोलंदाजीची जबाबदारी रवी बिश्नोईकडे दिली आहे. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत एक सामन्यात खराब गोलंदाजीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्याला संघात जागी दिली गेली आहे.
Maharashtra TimesIND vs ZIM T20 Series : भारत-झिम्बाब्वे सामने फ्रीमध्ये कुठे पाहायचे? वेळ बदलली, नवीन चॅनेलवर होणार थेट प्रक्षेपण
बॉलिंगचा निर्णय घेतलाय, मी इथे पहिल्यांदाच आलोय त्यामुळे पिच कशी आहे याचा मला काही अंदाज नाही. बाजूचे सराव पिच पाहता चेंडू चांगला बाऊन्स मिळेल. झिम्बाब्वे संघाने गेल्या काही वर्षांमध्ये चांगली कामगिरी केली असून वर्ल्ड कपमध्ये ते ज्या प्रकारे खेळले ते अप्रतित होतं. आम्ही आज तीन वेगवान गोलंदाज आणि एका स्पिनरला संधी दिल्याचं श्रेयस अय्यर म्हणाला.
Maharashtra TimesTeam India : आयर्लंडनंतर इंग्लंडने धडा शिकवला, आता झिम्बाब्वेची धमकी; टीम इंडियाला मोठं आव्हान, मालिकेपूर्वी श्रेयस अय्यर काय म्हणाला?
(भारत प्लेइंग 11): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (WK), श्रेयस अय्यर (C), तिलक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव

(झिम्बाव्बे प्लेइंग 11): ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमणी (WK), बेन कुरन, डायन मायर्स, सिकंदर रझा (C), रायन बर्ल, वेस्ली माधेवरे, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझारबानी