इंग्लंडकडून जोस बटलर याने आक्रमक सुरूवात केली. २१ चेंडूत ३६ धावा काढल्या यामध्ये ४ चौकार आणि २ षटकार मारले. बटलर आता सेट झाले असे वाटत असताना श्रेयसने प्रिन्सकडे चेंडू सोपवला. पॉवर प्लेची शेवटची म्हणजेच सहावी ओव्हर टाकताना पहिल्याच चेंडूवर त्याने बटलरला बोल्ड करत भारताला पहिले यश मिळवून दिला. त्यानंतर प्रिन्सने इंग्लंड संघाचा कर्णधार हॅरी ब्रूक याला १६ धावांवर आऊट करत दोन धक्के देत इंग्लंडला बॅकफूटला ढकललं.
Erling Haaland : विश्व फुटबॉलचा नवीन हिरो, नॉर्वेचं ‘गोल मशीन’, एर्लिंग हालँड नेमका कोण? पोरानं बापाचं नाव काढलं, संपूर्ण प्रवास जाणून घ्या
प्रिन्स यादवने आयर्लंडविरूद्धच्या दौऱ्यात वनडे आणि टी-२० दोन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. आपल्या पदार्पणाच्या सामन्यामध्ये प्रिन्स यादव याने २ वन डे सामन्यात आणि १ टी-२० सामन्यात प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या आहेत.
मॅनेजरलाच गर्लफ्रेंड दाखवलं, बदनामी केली; टीम इंडियाचा स्टार अभिषेक शर्मासोबत कोणाचं षडयंत्र? वैतागून थेट न्यायालयात गेला
दरम्यान, आजच्या सामन्यात टॉस जिंकत श्रेयस अय्यरने सलग पाच टॉस जिंकण्याच्या यादीत समाविष्ट झाला आहे. सर्वाधिक सलग टॉस जिंकण्याचा विक्रम महेंद्र सिंग धोनीच्या नावावर आहे. धोनीने (मे २०१९ आणि फेब्रुवारी २०१२) सलग सात टॉस जिंकले आहेत. दुसऱ्या स्थानी विराट कोहली (सहावेळा) आणि तिसऱ्या स्थानी रोहित शर्मा (पाचवेळा) आहे.
भारत (प्लेइंग 1) : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (WK), श्रेयस अय्यर (C), शिवम दुबे, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड (प्लेइंग 11): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (WK), हॅरी ब्रूक (C), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग
