Saina Nehwal Politics : ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल निवडणूक राजकारणात उतरणार का? भाजपमध्ये असलेल्या नेहवालने याबाबत पहिल्यांदाच स्पष्ट संकेत देत मनातला प्लॅन सांगितला आहे. तिने नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊ.

राजकीय मैदानात उतरण्याबाबत सायनाचं मोठं वक्तव्य
सायनाने २०२० मध्ये भाजपचे ( BJP ) राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. खेळातील निवृत्तीनंतर आता देशाची सेवा करण्याच्या हेतूने ती सक्रिय राजकारणात येऊ पाहतेय. निवडणूक लढवण्याबाबत बोलताना एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेला ती म्हणाली की, “सध्या मी कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही, पण मी नक्कीच यावर गांभीर्याने विचार करत आहे.”
Dhruv Jurel tattoo : श्रीलंकेत मैदान गाजवल्यानंतर ‘जय जवान जय किसान’ सेलिब्रेशन, टॅटूमागची खरी कहाणी सांगताना ध्रुव काय म्हणाला?
ती पुढे म्हणाली, “मी एवढी वर्षे देशासाठी खेळले. आता मी भाजपमध्ये आहे आणि मला हा पक्ष आवडतो. ते ज्या प्रकारे देशाच्या विकासासाठी काम करत आहेत, ते पाहून मी त्यांच्याशी जोडली गेली आहे. मी नेहमीच देशाच्या भल्याचा विचार केला आहे आणि अनेक पदकेही जिंकली आहेत. त्यामुळे आता आपण सर्वांनी एकत्र येऊन देशासाठी काम करावं अशी माझी इच्छा आहे.”
ट्रीसा-गायत्रीच्या ऐतिहासिक कामगिरीला सलाम
राजकारणाव्यतिरिक्त सायनाने BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२६ मधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवरही भाष्य केलं. महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावणाऱ्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीच्या खेळाचं तिने विशेष कौतुक केलं.
Dhruv Jurel Century News : ध्रुव जुरेलने 115 धावा कुटल्या, नाबाद राहिला; तरीही नावावर लागला नकोसा विक्रम
सायना म्हणाली, “मला यंदा सिंगल्समध्ये भारताकडून आणखी पदकांची अपेक्षा होती. पण ट्रीसा आणि गायत्री यांच्या कामगिरीचा मला सार्थ अभिमान आहे. दबावाच्या परिस्थितीतही त्यांनी अतिशय संयमाने आणि प्रचंड आत्मविश्वासाने खेळ केला.”
१५ वर्षांचा दुष्काळ संपवला
दरम्यान, जागतिक क्रमवारीत ३९ व्या स्थानावर असलेल्या ट्रीसा आणि गायत्री या जोडीने या स्पर्धेत कमालीचा खेळ दाखवला. उपांत्य फेरी गाठताना त्यांनी चक्क तीन ‘सीडेड’ (Seeded) जोड्यांना धूळ चारली. विशेष म्हणजे, या पदकासह त्यांनी महिला दुहेरीतील भारताची तब्बल १५ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. याआधी २०११ मध्ये ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या दिग्गज जोडीने भारताला या प्रकारात पदक जिंकून दिलं होतं.

