Headlines

तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आमिर खान, गौरी स्प्रॅटसोबतच्या रजिस्टर मॅरेजचा पहिला फोटो समोर


Aamir khan and Gauri spratt Marriage Photo: अभिनेता आमिर खान आज तिसऱ्यांदा लग्न बंधनात अडकला. आमिर आणि गौरी स्प्रॅट यांचं रजिस्टर मॅरेज नुकतंच पार पडलं.

Aamir Khan and Gauri Spratt register marriage
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना चर्चा सुरू होती ती अभिनेता आमिर खान याच्या तिसऱ्या लग्नाची. आमिर आणि त्याची पार्टनर गौरी स्प्रॅट यांचं रजिस्टर मॅरेज नुकतंच पार पडलं. याचे फोटोही आता समोर आले आहेत.

कुटुंबिय आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत दोघांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली. अंबानी कुटुंबियांसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आमिरच्या या खास दिवशी उपस्थित राहत त्याला शुभेच्छा दिल्या. तर क्रिकेटपटू इरफान पठाणनं देखील हजेरी लावली आहे.

Maharashtra Times‘MPSC’ चं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचा संघर्ष, अंजिक्य राऊतच्या मराठी सिनेमाची चर्चा, पहिल्यांदाच दिसला वेगळ्या भूमिकेत

मुलांची सक्रिय उपस्थिती
या लग्नाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमिर खान आणि गौरी यांच्या आधीच्या लग्नांमधील मुले या सोहळ्यात आनंदाने सहभागी झाली आहेत. आमिर खान याची पहिली पत्नी रीना यांची मुलं अभिनेता जुनैद खान आणि इरा खान, तसंच दुसरी पत्नी किरण राव यांचा मुलगा आझाद राव खान हे सर्वजण या लग्नाला उपस्थित होते. गौरी स्प्रॅट यांचा लहान मुलगाही या सोहळ्यात होता.

“हे लग्न आम्ही अगदी घरातच करत आहोत. हे आमच्यासाठी खूप खास आहे. आम्हा दोघांनाही तुमच्या सर्वांचे आशीर्वाद हवे आहेत जेणेकरून आमचा पुढील प्रवास सुखाचा होईल.” असं आमिरनं या लग्नाबद्दल बोलताना म्हटलेलं.

आमिर आणि गौरीची फिल्मी लव्हस्टोरी
अनेकांना वाटेल की हे नातं काही वर्षांपूर्वीचे आहे, पण आमिर आणि गौरीची ओळख तब्बल २५ वर्षांपूर्वी झाली होती. त्यांची पहिली भेट बंगळुरूमध्ये झाली होती. त्यानंतर काही काळानंतर त्यांच्यातील संपर्क तुटला आणि दोघांचं आयुष्य वेगवेगळ्या मार्गांवर गेलं. साधारण २-३ वर्षांपूर्वी आमिरच्या चुलत भावामार्फत या दोघांची पुन्हा एकदा गाठ पडली. २५ वर्षांनंतर पुन्हा भेटल्यावर त्यांच्यातील जुन्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले.

Ajinkya Raut Interview : मी गौतम बुद्धांच्या भूमिकेत, अभिनेता अजिंक्य राऊतला पडायचं स्वप्न

Maharashtra TimesAamir khan 3rd wedding: आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला अंबानी कुटुंबाची हजेरी, वाटेत झाड कोसळल्यानं गाड्यांचा ताफा थांबला, राज ठाकरेंचीही उपस्थिती

कोण आहे आमिरची तिसरी पत्नी गौरी?
गौरी ही मूळची बंगळुरूची रहिवासी असून तिचे आजोबा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. तिनं लंडनमधून फॅशन, स्टायलिंग आणि फोटोग्राफीचे उच्च शिक्षण घेतलं आहे. सध्या ती ‘आमिर खान प्रॉडक्शन्स’सोबत काम करत आहे. गौरीला ६ वर्षांचा एक मुलगा आहे. तिला प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहायला आवडतं.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा