![]()
छत्रपती संभाजीनगर येथे ‘कॉक्रोज जनता पार्टी’ (CJP) ची दोन दिवसीय विशेष बैठक सुरू आहे. देशभरातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पक्षाचा पुढील रोडमॅप, संघटना वाढवणे आणि देशासमोरील प्रमुख आर्थिक व सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली जात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे. या बैठकीत ‘कॉक्रोज इन्क्लेव्ह’ अंतर्गत मंथन सुरू असून, त्यानंतर सविस्तर माहिती जाहीर केली जाईल, असे अभिजित दिपके यांनी सांगितले. CJP ला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत असून, त्यांच्या आंदोलनांना यश येत असल्याचा दावाही त्यांनी केला. पक्षाने झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी पक्षाचे प्रतिनिधी लवकरच झारखंडला भेट देणार आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर CJP ने तीव्र चिंता व्यक्त केली. पक्षांतराच्या राजकारणावर टीका करताना, सकाळी एका पक्षात निवडून आलेले आमदार व खासदार संध्याकाळी दुसऱ्या पक्षात दिसतात, असे म्हटले. ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) सारख्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राजकीय पक्ष फोडले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. देशातील स्वायत्त संस्थांवरील जनतेचा विश्वास कमी होत असून, यामुळे लोकशाही धोक्यात येत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या दोन दिवसीय बैठकीत राजकीय पक्ष सोडून सर्व घटकांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले. पक्षाची प्रत्यक्ष राजकारणात जाण्याची कोणतीही इच्छा नसून, माध्यमांमध्ये मात्र याविषयी उत्सुकता दिसून येत आहे, असे CJP ने स्पष्ट केले.
या बैठकीत देशातील बेरोजगारी, आर्थिक संकट, E20 चा मुद्दा, माध्यम आणि न्यायपालिकेची सद्यस्थिती तसेच देशभरात संघटना मजबूत करण्यासाठीचा पुढील रोडमॅप या प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे.
Source link
