Ashok and Nivedita Saraf Wedding story: मराठी सिनेइंडस्ट्रीतील स्टार कपल अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ सध्या चर्चेत आहे. नुकताच त्यांनी लग्नाचा ३७ वाढदिवस साजरा केला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अशोक सराफ आणि निवेदिता जोशी-सराफ या अतिशय लोकप्रिय जोडीचा अभिनय प्रवास, अनेक आठवणी, गोड सहजीवन हे सारे चाहत्यांना नेहमीच ऐकायला आवडतं. या स्टार जोडीनं नुकताच लग्नाचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं पुन्हा एखदा त्या दोघांच्या नात्याबद्दल, त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोललं जातंय. इच्छित वरप्राप्ती होओ.. अनेक मुलाखतींमध्ये अशोक आणि निवेदिता सराफ यांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलंय.’धुमधडाका’च्या सेटवर आपले प्रेमसंबंध जुळल्याचं ते सांगतात. या सिनेमातील एका प्रसंगाच्या चित्रीकरणात निवेदिता या अशोक यांना नमस्कार करतात आणि अशोक त्यांना इच्छित वरप्राप्ती होण्याचा आशीर्वाद देतात. तोच आशीर्वाद पुढं प्रत्यक्ष आयुष्यातही खरा ठरला. कारण निवेदिता अशोक यांच्या प्रेमात पडल्या आणि पुढं ते दोघे विवाहबद्ध झाले.
अन् प्रेमाची जाणीव झाली सेटवर ओळख झाल्यानंतर दोघे चांगले मित्र झाले. पण निवेदिता यांच्यावरील प्रेमाची जाणीव व्हायला अशोक सराफ यांना वेळ लागला. ही जाणीव नेमकी कधी झाली, याच किस्साही अशोक सराफ यांनी सांगितलेला. निवेदिता यांचे वडील अशोक यांचे चांगले मित्र होते. त्यांनीच दोघांची ओळख करून दिली होती. खास किस्सा सांगताना अशोक म्हणाले की, मी १९८८ मध्ये मामला पोरींचा हा चित्रपट करत होतो. त्या चित्रपटात माझ्यासोबत निवेदिताही होती. काम करताना निवेदिताचं पॅकअप झालं. ती माझ्याजवळ आली आणि तिनं फार सहज पुन्हा भेटू, बाय असं म्हटलं. खरंतर त्यावेळी मला फार वाईट वाटलं होतं. पण मी ते चेहऱ्यावर कुठेही दिसू दिलं नाही. तिने दारातून माझ्याकडे वळून पाहिलं, तेव्हा प्रेमाची जाणीव झाली, असं अशोक सराफ यांनी सांगितलं.
प्रेक्षकांच्या या लाडक्या जोडीच्या लग्नाला आता ३७ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्तानं निवेदिता यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा