Ishan Kishan RBI Office Patna : इशान किशन हा क्रिकेटर म्हणून सर्वांना परिचित आहे, पण आज तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. होय त्याला बँकेत पाहिल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. काय घडलं?
मुंबई : टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज आणि यष्टीरक्षक इशान किशन नुकताच पाटण्यामधील आरबीआयच्या शाखेमध्ये पाहायला मिळाला. कार्यालयामध्ये पोहोचल्यानंतरचे त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये इशानच्या गळ्यात आरबीआयचे ओळखपत्र पाहायला मिळत आहे, त्याशिवाय तो कर्मचाऱ्यांबरोबर फोटो काढतानाही दिसत आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे इशानला एक कर्मचारी म्हणून पाहून त्याचे चाहते खूप चकीत झाले आहेत.तर आता इशान या शाखेत काय करत होता, याबद्दलचीही माहिती समोर आली आहे.
आरबीआयमध्ये काम करतो इशान
तर त्याचे झाले असे की, इशान किशन हा आरबीआयमध्ये काम करतो. त्याच्या या सरकारी जॉबद्दल अनेकांना माहितीच नाही म्हणून ते आश्चर्यचकित होत आहेत. दरम्यान, इशानहा भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. त्याची ही नियुक्ती २०१७ मध्येच झाली आहे. क्रिडा कोट्याअंतर्गत त्याची ही निवड झाली आहे. त्यावेळी इशान केवळ १८ वर्षांचा होता, जेव्हा इशानची निवड झाली तेव्हा तो केवळ एक उदयोन्मुख क्रिकेटर होता. त्याने डी वाय पाटील ट्रॉफीसारख्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये आरबीआयचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून जेव्हा कधी वेळ मिळेल, तेव्हा इशान बँकेमध्ये नेहमी त्याची उपस्थिती दर्शवतो.
इशान आता भारतीय क्रिकेट संघातला एक मोठा खेळाडू झाला आहे. त्याचकारणाने आता तो जेव्हाकधी बँकेत जातो, तेव्हा बँक कर्मचारी त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी करतात.
इशानला किती पगार दिला जातो?
दरम्यान, सर्वांना आता एक प्रश्न पडला आहे, की इशानला किती पगार मिळतो. तर सहायक व्यवस्थापक हे पद म्हणजे ग्रेड ए स्तरावरचे पद आहे. आरबीआयमध्ये या पदावरील व्यक्तीला अंदाजे मूळ वेत ह४५ हजार ते ४९ हजारांपर्यंत मिळते. महागाई भत्ता, घरभाडे आणि इतर सरकाही लाभांना जोडून एकूण पगार हा ९० हजार ते १ लाख १५ हजार रुपयांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे कपात वगळता इशान किशनला आरबीयकडून दरमहिन्याला अंदाजे ७५ हजार ते ९०हजार दिले जातात.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा