Headlines

ओमराजेंनी राणा पाटलांसोबत बसू नये; तेरमधील कार्यकर्ते मनातलं बोलले – omraje nimbalkar may leave uddhav thackerays shiv sena workers reaction



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा राजकारणात सुरू आहे. ठाकरेंचे विश्वासू असलेले ओमराजे निंबाळकर देखील त्यांची साथ सोडण्याच्या वाटेवर आहेत. एक वेळी अशी होती जेव्हा ओमराजे ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांविरोधात आक्रमक व्हायचे. मात्र आता त्यांनाही गद्दारीच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. ओमराजेंच्या या भूमिकेवर त्यांच्या तेर गावातील कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले आहे. “भाजप नेते राणा पाटील यांच्याविरोधात असलेल्यांच्या सोबत आम्ही आहोत.. असे म्हणत काही कार्यकर्त्यांनी ओमराजेंच्या भूमिकेचं समर्थन केलं. मात्र ओमराजेंनी राणा पाटलांसोबत एकत्र राहू नये, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत