Shubman Gill News : पहिल्या वनडे सामन्यामध्ये केलेली चुक सुधारत इंग्लंड संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात ४ विकेटने विजय मिळवला. या सामन्यामध्ये भारताचं नेमकं कुठं चुकलं याबाबत कॅप्टन शुभमन गिल सांगताना त्याला कोणत्या खेळाडूंकडून आशा होती आणि कुठे गडबड झाली हे स्पष्ट केलं आहे.

भारताने सामना कुठे गमावला?
25 ओव्हरनंतर चांगल्या स्थितीत असूनही जास्त विकेट्स गेल्यामुळे सामना हातून निसटला. आमच्या खालच्या फळीतील फलंदाजांकडून खूप अपेक्षा होत्या पण ते अपेक्षेप्रमाणे खेळू शकले नाहीत, त्यामुळे पुढच्या वेळी छोट्या-छोट्या भागीदारी करण्याचा प्रयत्न करू. संघासाठी महत्त्वाचा असलेला सुंदर फलंदाजी करताना जखमी झाला, त्यामुळे आम्हाला मुख्य गोलंदाजांनाच गोलंदाजी करावी लागली, ज्यामुळे फारसा फरक पडला नाही. सामन्याच्या मध्यात आमची गती थोडी कमी झाली आणि जो रूट अशा धावांचा पाठलाग करण्यात तरबेज असल्याचं शुभमन गिल म्हणाला. गिलच्या म्हणण्यानुसार विकेट आणि श्रेयस यांनी डाव सावरला होता परंतु त्यानंतर भारताच्या ५५ धावांत ७ विकेट गेल्या त्यामुळे भारताला २५० धावसंख्याही उभारता आली नाही.
IND vs ENG 2nd ODI : भारत वि. इंग्लंड दुसरा वनडे, के.एल. राहुल प्लेइंग 11 मधून बाहेर; कॅप्टन शुभमन गिलची इच्छा नसताना घ्यावा लागला निर्णय
दुसऱ्या वनडेचा सविस्तर आढावा
भारताकडून आज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी दमदार सुरूवात केली होती. रोहितने सावध पवित्रा घेतल्याचं दिसत होतं. त्यामुळे शुभमन गिल याने आक्रमक पवित्रा घेत रनरेट वाढवण्याचे काम केले. परंतु चौकार मारण्याच्या नादात गिल ३१ धावांवर आऊट झाला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा जम बसला असे वाटत होते पण विल जॅक्सने रोहितला (२६ धावा) आऊट करत ही जोडी फोडली. रोहित आणि कोहलीमध्ये ६० धावांची भागीदारी झाली होती. ईशान किशनही लगोलग १ धाव काढून परतला, श्रेयस अय्यर आणि विराट यांनी आपल्या हातात डावाची सूत्रे घेतली होती. दोघांची झालेली ६७ धावांची भागीदारी आर्चरने कोहलीला ६६ धावा करत संपवली. त्यानंतर कोणालाही मोठी खेळी करता आली नाही.अक्षर पटेल १ धाव, वॉशिंग्टन सुंदर २ धावा आणि शिवम दुबे ० धावांवर माघारी परतला. १७८-४ असलेला भारतीय संघ २३३ धावांवर ऑल आऊट झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि एटकिन्सन यांनी सर्वाधिक ३-३ विकेट नावावर केल्या होत्या.
INDvsENG 2nd ODI : दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा कॅप्टन बदलणार? सामन्याची वेळ बदलली, किती वाजता सुरू होणार?
या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला पहिल्याच बॉलवर बुमराहने झटका दिला होता. डकेटला शून्यावर माघारी पाठवले. चौथ्या ओव्हरमध्ये बेथल ४ धावांवर आऊट केले. इंग्लंडची अवस्था ८-२ अशी झाली होती. मात्र जो रूट याने सर्वांसोबत केलेल्या भागीदारीमुळे इंग्लंडने डाव सावरला. भारतीय गोलंदाजांनी वेळोवेळी धक्के देत जोड्या फोडल्या, यामध्ये हॅरी ब्रूक १६ धावा, सॅम करन २६ धावा, जोस बटवर १७ धावा काढून परतले. मात्र त्यानंतर विल जॅक्ससोबत रूटने ८६ चेंडूत ७२ धावांची भागीदारी करत सामना फिरवला.
दरम्यान, या मालिकेमध्ये भारत आणि इंग्लंडने १-१ सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसरा आणि शेवटचा सामना जो जिंकेल तो मालिका खिशात घालणार आहे. तिसरा सामना रविवारी १९ जुलैला लॉर्ड्स मैदानावर पार पडणार आहे.

