Headlines

आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला रणदीप हुड्डा, तर ‘देशसेवा’ करणारे कुठेत? म्हणत राखी सावंतची कंगना रणौत आणि रवी किशन यांच्यावर टीका


मुंबई: आसाममध्ये अनेक जिल्ह्यांत भीषण पूरस्थितीमुळं लाखो लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. या कठीण काळात बॉलिवूडही आसामच्या मदतीसाठी पुढं आलं आहे. अनेक कलाकारांनी पूरग्रस्तांची मदत केली आहे. तर अभिनेता रणदीप हुड्डा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिखलात उतरला आहे.

आसाममधील शिवसागर जिल्ह्यात जाऊन रणदीपनं प्रत्यक्ष पूरग्रस्तांची भेट घेतली आणि गुडघाभर पाण्यात उतरून लोकांना अन्न व अत्यावश्यक वस्तूंचं वाटप केलं. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणदीप हुड्डानं ‘ग्लोबल सिक्स’ या स्वयंसेवी संस्थेच्या टीमसोबत मिळून निमाईजान आणि आसपासच्या पूरग्रस्त भागात मदतकार्य राबवलं. बोटीनें आणि पाण्यात चालत जाऊन त्यानं अडकलेल्या कुटुंबांपर्यंत अन्नधान्य, पिण्याचं पाणी आणि औषधे पोहोचवली. याशिवाय शिवसागर रेल्वे स्थानकावर उभारण्यात आलेल्या लंगरमध्ये रणदीपनं स्वतः पूरग्रस्तांना जेवण वाढलं.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सढळ हातानं मदत करा

मदतकार्यादरम्यान माध्यमांशी बोलताना रणदीप म्हणाला की, पूर येऊन १० दिवस उलटले असले, तरी अनेक भागात अजूनही पाणी साचलेलं आहे आणि अनेक कुटुंबे अडकून पडली आहेत. साचलेल्या पाण्यामुळं रोगाचा प्रसार होण्याचा मोठा धोका आहे. लोकांना कोरड्या रेशनपेक्षा इतर आवश्यक वस्तू आणि औषधांची जास्त गरज आहे. तसंच, रणदीपनं देशवासीयांना आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सढळ हातानं मदत करण्यासाठी पुढं येण्याचं आवाहन केलं आहे.

Maharashtra TimesMilind Gawali: ती मरणाच्या दारात जाताना मला दिसत होती, म्हणून २० वर्षात साखर खाल्ली नाही; मिलिंद गवळींनी सांगितला भावुक प्रसंग
शिवसागर इथल्या ऐतिहासिक गुरुद्वारामध्ये जाऊन त्यानं पूरग्रस्तांच्या लवकरात लवकर पुनर्वसनासाठी प्रार्थनाही केली. रणदीप हुड्डाच्या या संवेदनशील कृतीवर सोशल मीडियावर नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राखी सावंतची कंगना आणि रवी किशन यांच्यावर टीका

तर खासदार म्हणून ज्यांना निवडून दिलं ते सिनेइंडस्ट्रीतील कलाकार अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेते रवी किशन यांनीही आता इकडच्या तिकडच्या विषयांवर बोलण्यापेक्षा आसाममध्ये जाऊन देशसेवा करावी, असा टोला राखी सावंत हिनं लगावला आहे.

Maharashtra TimesPradeep Rawat: आयुष्यात चढ-उतार, पाच महिन्यात घटस्फोट, आरोप ठरलेले खोटे; प्रदीप रावत यांना साऊथ इंडस्ट्रीत न मागता मिळायचं तिप्पट मानधन

Assam Flood : आसाम, ओडिशामध्ये भयंकर पाऊस, डोंगर खचले, पुरात गावं बुडाली, लाखो उघड्यावर

आसाममधील पुरात ८० हून अधिक जण मृत्युमुखी

आसाममध्ये अनेक जिल्ह्यांत सतत पडणाऱ्या पावसामुळं जवळपास ५.६५ लाख नागरिकांना पुराचा फटका बसला, असं अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदाच्या पुरातील एकूण मृतांची संख्या ८० च्या वर पोहोचली आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमायांनी अप्पर आसाम जिल्ह्यांतील अनेक पूरग्रस्त भागांना भेट देऊन पीडितांशी संवाद साधला आणि प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना चार लाख रुपयांची भरपाई देण्याचे जाहीर केली. ‘जी गावे पाण्याखाली आहेत, तिथं मदत साहित्य पोहोचविण्यात अडचणी आल्या आहेत. मात्र, जे लोक मदत छावण्यांपर्यंत पोहोचू शकले, त्यांच्यासाठी मदत साहित्याच्या वाटपात कोणतीही कमतरता किंवा समस्या नाही,’ असे सरमा यांनी स्पष्ट केले. ‘गेल्या २४ तासांत पुरात ८० हून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. बिस्वनाथ, चाराइदेव, धेमाजी, दिब्रुगड, गोलाघाट, जोरहाट, कामरूप, कामरूप मेट्रोपॉलिटन, कार्बी आंगलाँग, नागाव, शिवसागर आणि तिनसुकिया जिल्ह्यांमध्ये पाच लाख ६४ हजार ६००हून अधिक लोक बाधित झाले आहेत.