Update Aadhaar Mobile Number: नागरिकांच्या सुविधेसाठी नवीन अधिकृत ‘Aadhaar’ ॲपवर अत्यंत महत्त्वाची सेवा उपलब्ध आहे. या ॲपमधील प्रगत ‘फेस ऑथेंटिकेशन’ तंत्रज्ञानाच्या मदतीने आता नागरिक कोणत्याही आधार केंद्रावर न जाता, थेट आपल्या मोबाईलवरूनच आधार कार्डमधील मोबाईल नंबर आणि पत्ता सुरक्षितपणे बदलू शकतात. चला तर मग याविषयीची माहिती ही पुढे जाणून घेऊया.

नवीन आधार ॲपवरून ‘मोबाईल नंबर’ बदलण्याची प्रक्रिया
पूर्वी आधार कार्डमध्ये नवीन मोबाईल नंबर लिंक करणे किंवा जुना नंबर बदलणे यासाठी आधार केंद्रावर जाऊन हाताचे ठसे (बायोमेट्रिक्स) देणे अनिवार्य होते. मात्र, UIDAI च्या नवीन नियमांनुसार, जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल, तर तुम्ही चेहऱ्याच्या पडताळणीद्वारे (Face ID) हा बदल करू शकता.
‘मोबाईल नंबर’ बदलण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून अधिकृत Aadhaar App डाऊनलोड करा.
- ॲप उघडून तुमचा 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि प्राथमिक पडताळणी पूर्ण करून लॉगइन करा.
- मुख्य स्क्रीनवरील खालील बाजूस असलेल्या सेवा या पर्यायावर क्लिक करा आणि ‘Mobile Number Update’ हा पर्याय निवडा.
- जो नवीन मोबाईल नंबर तुम्हाला लिंक करायचा आहे, तो टाईप करा. त्या नंबरवर एक ओटीपी येईल, तो भरून पडताळणी पूर्ण करा.
- यानंतर ॲप तुमचा फ्रंट कॅमेरा सुरू करेल. AadhaarFaceRD या पडताळणी प्रणालीच्या साहाय्याने तुमचे ‘फेस ऑथेंटिकेशन’ केले जाईल.
- ही प्रक्रिया यशस्वी झाल्यावर, यूपीआय, नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे 75 प्रोसेसिंग फी ऑनलाईन भरा. पुढील 15 दिवसांच्या आत तुमचा नवीन नंबर डेटाबेसमध्ये अपडेट केला जाईल.
नवीन आधार ॲपवरून ‘पत्ता’बदलण्याची प्रक्रिया
पत्ता बदलण्याची ऑनलाईन प्रक्रिया अतिशय सोपी असून, त्यासाठी तुम्हाला पत्त्याचा एक वैध पुरावा कागदपत्र म्हणून अपलोड करावा लागतो.
‘पत्ता’बदलण्याची प्रक्रिया
- आधार ॲपमधील ‘Services’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Address Update’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा नवीन आणि पूर्ण पत्ता (ज्यामध्ये पिन कोड, राज्य, जिल्हा, आणि घराचा क्रमांक समाविष्ट असेल) अचूकपणे टाईप करा.
- यानंतर, तुमच्या नावावर असलेले वैध कागदपत्र (उदा. मतदार ओळखपत्र, वीज बिल, रेशन कार्ड, बँक पासबुक किंवा पासपोर्ट) मूळ प्रतीवरून कॅमेऱ्याने स्पष्ट स्कॅन करून अपलोड करा.
- माहितीची अचूकता तपासण्यासाठी इंग्रजी आणि तुमच्या स्थानिक भाषेतील ‘Preview’ तपासा.
- अंतिम मंजुरीसाठी पुन्हा एकदा ‘फेस ऑथेंटिकेशन’ प्रक्रिया पूर्ण करा आणि 75 ऑनलाईन शुल्क भरा.
- पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक SRN (Service Request Number) मिळेल, ज्याच्या मदतीने तुम्ही UIDAI पोर्टलवर तुमच्या अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता.

