Vaibhav Sooryavanshi news : आज भारत आणि इंग्लंडमधील दुसरा सामना पार पडणार आहे. आजच्या सामन्यामध्ये वैभव खेळण्याची दाट शक्यता मानली जात आहे. हा सामना रात्री दहा वाजता होणार नाही, मग किती वाजता जाणून घ्या.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत-इंग्लंडदरम्यानच्या मालिकेतील दुसरी टी-२० क्रिकेट लढत आज, शनिवारी होणार आहे. या लढतीत संजू सॅमसनला विश्रांती देऊन युवा आक्रमक सलामीवीर वैभव सूर्यवंशीला स्थान मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. संजू खराब फॉर्मातून जात आहे. दुसरीकडे, मधल्या फळीतील तिलक वर्माच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे.
भारत-इंग्लंड दुसरी टी-२० आज लढत होणार आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पहिल्या लढतीत संजू सात चेंडूंत एक धाव काढून माघारी परतला होता, संजूने टी-२० वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करून संघात स्थान मिळवले होते. मात्र, त्याला आता १५ वर्षीय वैभवशी स्पर्धा करावी लागणार आहे. खेळपट्टीवर चेंडू स्विंग होत असताना संजूच्या फलंदाजीतील तांत्रिक त्रुटी समोर येत आहेत. मागील तीन लढतीत संजूला १, ०, ५ अशाच धावा करता आल्या आहेत. Karanbir Singh : हिटमॅनलाही मागे टाकणारा हा खेळाडू आहे तरी कोण? पठ्ठ्यानं अवघ्या 60 सामन्यांत धुमाकूळ घातला संजूच धावांसाठी संघर्ष करतो आहे असे नाही, तर तिलक वर्माची मधल्या घटकांमधील बचावात्मक खेळण्याची शैलीदेखील चिंतेचा विषय बनली आहे. संथ गोलंदाज आल्यावर किंवा वेगवान गोलंदाजांनी चेंडूचा वेग कमी केल्यावर तिलकला धावगती वाढवणे कठीण जाते. २०२६ मधील १२ टी-२० सामन्यांमध्ये तिलकला फक्त १२ षटकार मारता आले आहेत, म्हणजेच सरासरी प्रत्येक सामन्यात एक षटकार, ‘फिनिशर’ची भूमिका बजावणाऱ्यासाठी ही आकडेवारी अत्यंत सुमार आहे.त्यामुळे आजच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी हे ट्र्म्प कार्ड वापरले जाऊ शकते. ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ची खेळपट्टी फिरकीला साथ साजेशी असल्याने गोलंदाजी विभागात बदल होण्याची शक्यता कमी आहे. India vs England ODI Series : रोहित-विराटला रोखण्यासाठी इंग्लंडने टाकला मोठा डाव; भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघ घोषित भारत-इंग्लंड दुसरी टी-२० सामना ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे पार पडणार असून भारतीय वेळेनुसार सात वाजता सामन्याला सुरूवात होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार आणि सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर ३१ सामन्यांमध्ये भारताने १८ तर इंग्लंड १२ विजय मिळवले असून १ सामना अनिर्णित राहिला आहे.
खेळ आकड्यांचा
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरील ११३ पैकी सहा आंतरराष्ट्रीय टी-२० लढती धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकल्या आहेत. यातील चार लढती प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकल्या असून, तीन लढती अनिर्णित राहिल्या आहेत.
ओल्ड ट्रॅफर्डच्या १७० खेळपट्टीवरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १५५ ते १७०च्या दरम्यान आहे. या मैदानावर इंग्लंडने २०२५मध्ये २ बाद ३०४ अशी सर्वोच्च धावसंख्या रचली आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.
पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)
‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.
शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.… आणखी वाचा