IND vs ENG 1st ODI : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात दिसले. वर्ल्डकप नंतर पहिल्यांदाच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसपित बुमराह तिघे एकत्र खेळत आहेत. भारताने हा सामना सहज जिंकला पण ‘रोको’ अपयशी ठरले, परंतु कॅप्टन शुभमन गिल याला आपल्या वरिष्ठ खेळाडूंवर डोळे झाकून विश्वास आहे. सामना संपल्यावर नेमकं काय म्हणाला जाणून घ्या.

शुभमन गिल काय म्हणाला?
मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे संघाला खूप आत्मविश्वास मिळाला आहे. आमचे युवा गोलंदाज असल्याने आणि फलंदाजी अधिक अनुभवी आहे म्हणून मालिकेच्या पहिल्या सामन्यात आम्ही आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कारण ३२० धावांचे लक्ष्य असले तरी आमच्या फलंदाजीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सुरुवातीच्या ६ ते ७ ओव्हरमध्ये चेंडू स्विंग होत असताना आम्ही योग्य ठिकाणी गोलंदाजी केली आणि नंतर दबावात आल्यानंतरही ५ विकेट घेऊन चांगले पुनरागमन केले. २०२७च्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करत आहोत. आजची पिच आणि परिस्थिती दक्षिण आफ्रिकेसारखी होती जिथे नवीन चेंडूने फलंदाजी सोपी नव्हती, असं शुभमन गिल म्हणाला.
IND vs ENG : ना अक्षर पटेल, ना शुभमन; इंग्लंडच्या पराभवासाठी भारताचे तीन खेळाडू जबाबदार, इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुक काय म्हणाला?
शुभमन गिलने इंग्लंडच्या गोलंदाजीवर सुरुवातीपासून वर्चस्व राखताना आक्रमक सुरुवात केली. मात्र त्याचा अनुभवी सहकारी रोहित शमां धावांसाठी संघर्ष करीत होता. गिल आणि रोहितने ४५ चेंडूंत ४३ धावा जोडल्या, त्यात रोहितचा वाटा २१ चेंडूंतल ११ धावांचा होता. त्यावरून त्याचा संघर्ष लक्षात येईल. टी-२० मालिकेत वैभव सूर्यवंशीला टिकू न दिलेल्या जोफ्रा आर्चरने विराट कोहलीला चकवले.
IND vs ENG 1st ODI : आता कसं वाटतंय! भारताने इंग्लंडला पहिल्याच वनडेत लोळवलं, 6 विकेटने विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी, विजयाचे शिल्पकार कोण?
भारताची अवस्था ८.३ षटकांत २ बाद ४८ अशी झाली. गिलने श्रेयस अय्यरसह १०३ चेंडूंत १०१ धावा जोडत भारताच्या आशा उंचावल्या. हे दोघे इंग्लंडच्या गोलंदाजीवर वर्चस्व राखत असतानाच गिल पायात गोळे आल्यामुळे निवृत्त झाला. त्याने ७५ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह ८० धावा केल्या. २ बाद १४९वरून भारताचा डाव अचानक ४ बाद १६० असा घसरला. मात्र वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने नाबाद अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला.
IND vs ENG 1st ODI : भारत इंग्लंड मालिकेदरम्यान मोठी अपडेट, कोच गौतम गंभीरचा विश्वासूच सोडणार त्याची साथ, पडद्यामागे नेमकं काय चाललंय?
दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीने संघाला बळकटी आल्यासारखं झालं आहे. दोघांवर तितकाच विश्वास शुभमन गिलचा आहे. त्यामुळेच त्याने बिंधास्तपणे पहिल्यांदा गोलंदाजी केली. जरी दोघे अपयशी ठरले तेव्हा स्वत:च्या खांद्यावर जबाबदारी घेत भारताला दबावातून बाहेर काढले. स्नायू दुखावले गेल्याने त्याला ८० धावांवर माघारी जावं लागलं पण त्याची ही खेळी शतकापेक्षा मोठी होती.

