Headlines

‘ही टीम इंडिया नाही, मुंबईची टीम’; इंग्लंड विरुद्ध 4-0 ने व्हाईट वॉशनंतर माजी दिग्गजाने काढले वाभाडे; थेट नावेच मोजली


K Srikkanth on Team India : इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका गमावल्यानंतर माजी मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी संघनिवडीवर गंभीर आरोप केले आहेत. श्रेयस अय्यर, अजित आगरकर, शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे यांचाही त्यांनी उल्लेख केला. नेमकं काय म्हणाले?

Krish Shhrikant On Team India
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय क्रिकेट संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय. या पराभवानंतर टीम इंडियाच्या रणनीतीवर आणि खेळाडूंवर चहुबाजूंनी सडकून टीका होताना दिसतीये. अशातच आता बीसीसीआयचे माजी चीफ सिलेक्टर कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी एक अत्यंत खळबळजनक वक्तव्य करत वादाला तोंड फोडले आहे. “सध्याची टीम इंडिया ही भारताची टीम राहिली नसून ती ‘मुंबईची टीम’ झाली आहे,” असा गंभीर आरोप करत श्रीकांत यांनी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर आणि सिलेक्टर्सवर आसूड ओढले आहेत.

भारतीय क्रिकेटमध्ये ‘साऊथ क्रिकेटची लॉबी’ विरुद्ध ‘मुंबईची लॉबी’ असा संघर्ष कायमच पाहायला मिळतो. आता श्रीकांत यांच्या या वक्तव्यामुळे या वादात नव्याने ठिणगी पडली आहे.

श्रेयस कॅप्टन, आगरकर सिलेक्टर अन्…

‘चीकी चीका’ या युट्यूब शोमध्ये बोलताना माजी दिग्गज खेळाडू के. श्रीकांत यांनी टीम इंडियाच्या सद्यस्थितीवर आणि संघ निवडीवर मोठा संताप व्यक्त केला. टीम इंडियात सध्या मुंबईच्या लॉबीचाच दबदबा असल्याचा दावा त्यांनी केला. श्रीकांत म्हणाले, “सध्याची टीम इंडिया ही भारताची टीम वाटत नाही, तर ती मुंबईची टीम वाटते. टीम इंडियाचा नवा कॅप्टन श्रेयस अय्यर मुंबईचा आहे. टीमचा चीफ सिलेक्टर अजित आगरकर हा देखील मुंबईचाच आहे. एवढंच नाही तर, कॅप्टन श्रेयस अय्यरने ज्या नव्या ऑलराऊंडरला संघात आणलंय, तो सूर्यांश शेडगे देखील मुंबईचाच आहे.”

Maharashtra TimesHanuma Vihari : ‘गंभीरचे काही आवडते खेळाडू आहेत आणि तो त्यांना घेऊनच खेळतो’; माजी क्रिकेटपटूचा गंभीरवर खळबळजनक आरोप

शिवम दुबेच्या खराब फिल्डिंगवर भडकले

केवळ संघ निवडीवरच नाही, तर श्रीकांत यांनी टीम इंडियाच्या मैदानावरील खराब कामगिरीचेही वाभाडे काढले. विशेषतः अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेच्या सुमार फिल्डिंगवर त्यांनी कडाडून टीका केली. इंग्लंड दौऱ्यात शिवम दुबेची फिल्डिंग अत्यंत खराब राहिली, ज्याचा मोठा फटका टीम इंडियाला मॅचेस गमावून बसला, असे श्रीकांत यांनी स्पष्ट केले.

Maharashtra TimesIND vs ENG 1st ODI Playing 11 : भारत-इंग्लंड पहिला वनडे, रो-को इन, प्लेइंग 11 मध्ये मोठा मॅचविनर बाहेर! मॅच कुठे-किती वाजता?

बुमराहशिवाय पर्याय नाही का? भुवीची करून दिली आठवण

भारतीय संघाच्या बॉलिंग लाईनअपवरही श्रीकांत यांनी बोट ठेवले. ते म्हणाले की, “या मालिकेत पदार्पण करणाऱ्या प्रिंस यादवने इंग्लंडमध्ये चांगली बॉलिंग केली, पण त्याला फिल्डर्सची अजिबात साथ मिळाली नाही. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या बाबतीतही तेच घडलं. टीम इंडियाकडे सध्या जसप्रीत बुमराहशिवाय दुसरा कोणताही भरवशाचा पर्याय उरलेला नाही.”

विशेष म्हणजे, यावेळी बॉलिंगच्या पर्यायांवर बोलताना श्रीकांत यांनी भुवनेश्वर कुमारची आवर्जून आठवण करून दिली. “भुवनेश्वर कुमार अजूनही निवृत्त झालेला नाही, हे सिलेक्टर्सनी विसरू नये,” असा टोलाही त्यांनी लगावला.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा