Headlines

सोलापूर महापालिकेच्या सभेत राजकीय संस्कृतीचं दर्शन, महापौरांना मागे घ्यावा लागला पाकीट शब्द


सोलापूर महापालिकेत राजकीय संस्कृतीचं दर्शन झालं. विरोधकांकडून महापालिकेच्या सभागृहाबाहेर आंदोलन सुरु होतं. या आंदोलनावर टीका करताना महापौरांनी पाकीट घेऊन आंदोलन करत असल्याची टीका केली. त्यांच्या याच टीकेवरुन सत्ताधारी शिंदे गटाचे नगरसेवक आणि काँग्रेस नगरसेवकाने आक्षेप घेतला. यामुळे गोंधळ उडाला आणि महापौरांना अखेर आपले शब्द मागे घ्यावे लागले.

Solapur News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेची मंगळवारी सायंकाळी सर्वसाधारण सभा सुरू असताना मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर भाजप विरोधात आंदोलन केलं. महाविकास आघाडीतील काँग्रेस नगरसेवकांनी मात्र सभागृहात भाजपने मांडलेल्या विषयाला मूकसंमती दर्शवली. भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. भाजपने मांडलेल्या विषयाला सभागृहात काँग्रेसकडून समर्थन मिळाले आहे. मात्र बाहेर शिवसेना (उबाठा) आणि मनसे नेत्यांनी आंदोलन केलं आहे. त्यावर भाजपचे महापौर विनायक कोंड्याल यांनी उत्तर दिले, बाहेरच्या आंदोलनाकडे लक्ष देऊ नका, बाहेर आंदोलन करणारे हे पाकीट घेऊन आंदोलन करतायत.

महापौरांच्या पाकीट या शब्दावरून काँग्रेस नगरसेवक चेतन नरोटे, आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी ताबडतोब आक्षेप घेतला. यानंतर पाकीट या शब्दावरून सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात गोंधळ उडाला. लोकशाही पद्धतीने आंदोलन करणाऱ्यांबद्दल अशा शब्दाचा उपयोग कसा काय केला? असा प्रश्न उपस्थित करत आरडाओरड सुरू केली. अखेर भाजपचे महापौर विनायक कोंड्याल यांनी हा शब्द मागे घेत आहोत, असे सांगून गोंधळला शांत करण्याचा प्रयत्न केला.

आंदोलन का झाले?

सोलापूर महानगरपालिका पालिकेची जागा भाडे तत्त्वावर देण्याचा विषय सभागृहाच्या पटलावर आली आहे. सोलापुरात अनेक ठिकाणी सोलापूर महानगर पालिकेची जागा आहे. यावरून मागील आठ दिवसांपासून महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे. अखेर मंगळवारी संध्याकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या दोन महत्वपूर्ण जागा BOT तत्त्वावर म्हणजेच भाडे तत्त्वावर देऊन उत्पन्न वाढविण्याचा निर्णय झाला आहे.

सुरुवातीला सोलापुरातील सात जागा देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे शिवसेना उबाठा, मनसे, वंचित, काँग्रेस यांनी कडाडून विरोध केला होता. यानंतर 18 ऑगस्टला सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सात जागा भाडे तत्त्वावर देतील, असा समज अनेकांना होता. याच मुद्द्यावरुन सभा सुरू असताना, बाहेर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन करत भाजपचा जाहीर निषेध केला.

भाजपच्या महापौरांचं आंदोलनकर्त्याना पाकीट शब्दाची उपमा

सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा सभागृहात सुरू असताना, भाजप महापौर विनायक कोंड्याल यांचे लक्ष आंदोलनाकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी भाजपचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सभागृहात सांगितले त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते पाकीट घेऊन आंदोलन करत आहेत.

भाजप महापौर विनायक कोंड्याल यांनी उल्लेख केलेल्या पाकीट या शब्दावरून सभागृहात ताबडतोब काँग्रेस नगरसेवक चेतन नरोटे आणि शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी पाकीट हा शब्द पकडला आणि असा शब्द कसा काय वापरला? असा जाब विचारला. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्याना पाकीट शब्द वापरू नये, असे ठणकावून सांगण्याचा प्रयत्न केला.

पाकीट शब्दावरून भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न

पाकीट या शब्दावरून सोलापुरात मोठं राजकारण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौर विनायक कोंड्याल हे सोलापूर शहर मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे भावजी आहेत. शिवसेना (उबाठा)आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे पक्ष यावर कोणत आंदोलन करतील याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा