![]()
श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालय, अकोला येथील मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीन दिवसीय औद्योगिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. केवळ सैद्धांतिक ज्ञान न घेता त्याला प्रा
.
विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती मिळावी. नामांकित उद्योगांशी त्यांचा संपर्क वाढावा. अभियांत्रिकी शिक्षणातील सैद्धांतिक ज्ञानाचा प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात कसा उपयोग केला जातो, याची जाणीव व्हावी. हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
कार्यशाळेसाठी औद्योगिक क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते. उद्योग. प्रणव लखदिवे, गौरव गोतमारे, सुदेश भगत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणती कौशल्ये आत्मसात करावीत, याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, सांस्कृतिक व मानसिक विकास साधण्यासाठी महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सहशैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. महाविद्यालयीन जीवनातील विविध संधींचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधावा. यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. पंकज अर्डक यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनात प्रा. सुधीर ढोमणे, प्रा. शशिकांत ठाकरे, प्रा. महेश पुंडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी खिलेश गिल्ले, साक्षी बावस्कर, श्रावणी सगणे यांनी केले. आभार प्रेम इंगळे, समीक्षा गवई यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागातील प्रा. अमर टोलमारे, प्रा. अमित खेडकर, प्रा. नितेश पाचपोर, प्रा. सुरेश अलासे, प्रा. चेतना भगत, प्रा. वेद कुलट, विठ्ठल ढोबळे, महेंद्र पिठे यांनी नियोजन, समन्वय व अंमलबजावणीत मोलाचे योगदान दिले.
ज्ञानाला अनुभवाची जोड हवी मेकॅनिकल अभियांत्रिकी क्षेत्रात सॉफ्टवेअरचे महत्त्व, त्यांचा औद्योगिक क्षेत्रातील वापर तसेच विद्यार्थ्यांनी विकसित करावयाची तांत्रिक कौशल्ये यावर कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला. केवळ सैद्धांतिक ज्ञान न घेता त्याला प्रात्यक्षिक व औद्योगिक अनुभवाची जोड देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कामकाज, उत्पादन प्रक्रिया, डिझाईन, प्रोडक्शन, तांत्रिक बाबींची माहिती घेण्याची संधी मिळाली. त्यामुळे वर्गात शिकविलेल्या विविध संकल्पना प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणात कशा प्रकारे वापरल्या जातात, हे विद्यार्थ्यांना समजून घेता आले.
