Headlines

सावंतवाडी तालुक्यात मतदार नोंदणी ९० टक्के पूर्ण; ८ ऑगस्टपर्यंत मुदत


सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यात मतदार नोंदणीची प्रक्रिया ९० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित १० टक्के काम पूर्ण करण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच तालुक्यातील सहा मतदान केंद्रे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
यासंदर्भात सावंतवाडी प्रांत कार्यालयात बैठक पार पडली. बैठकीत निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार श्री. मुसळे व श्रीमती तारी यांनी मतदार नोंदणीचा आढावा घेतला. तसेच राजकीय पक्षांच्या बीएलओंना आवश्यक सूचना करण्यात आल्या. या बैठकीला शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे, दिनेश गावडे, परीक्षित मांजरेकर, राजू शेटकर आदी उपस्थित होते.

यावेळी नारायण राणे म्हणाले, “मतदार नोंदणीचे शंभर टक्के काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. “आंबोली, मुळवंदवाडी, कामतवाडी, इन्सुली, कोठावळेबांध, सावंतवाडी जिरंगवाडी आदी भागांतील काही मतदान केंद्रे स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्या केंद्रांतील मतदारांचा समावेश जवळच्या मतदान केंद्रांमध्ये करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी आपली मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही निवडणूक विभागाकडून करण्यात आले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत