Shresta Iyer News : टी-20 संघाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर श्रेयस अय्यरला अद्याप विजयाचं खाते उघडता आलेलं नाही. सलग पराभवांमुळे सुरू झालेल्या टीकेदरम्यान त्याची बहीण श्रेष्ठा अय्यर पुढे आली असून, क्रिकेटमधील वास्तव समजून घेण्याचा सल्ला तिने टीकाकारांना दिला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय टी-20 संघाचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर श्रेयस अय्यरची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्याच्या नेतृत्वाखाली भारताला सलग पाच सामन्यांत पराभव स्वीकारावा लागल्याने सोशल मीडियापासून क्रिकेट वर्तुळापर्यंत त्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या वाढत्या टीकेदरम्यान श्रेयसच्या बचावासाठी त्याची बहीण श्रेष्ठा अय्यर पुढे आली असून, तिने टीकाकारांना आरसा दाखवला आहे.
श्रेयस अय्यरला टी-20 संघाचं नेतृत्व मिळाल्यानंतर चाहत्यांच्या अपेक्षा मोठ्या होत्या. मात्र, सुरुवातीच्या सलग पराभवांमुळे त्याच्या कर्णधारपदावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. अनेक माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी त्याच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी एवढ्या कमी कालावधीत कोणत्याही कर्णधाराचं मूल्यमापन करणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं. अशा वातावरणात श्रेष्ठा अय्यरने भावाच्या समर्थनार्थ उघडपणे भूमिका घेतल्याने या चर्चेला आणखी वेगळं वळण मिळालं आहे.
श्रेष्ठा नेमकं काय म्हणाली?
एका पॉडकास्टमध्ये बोलताना श्रेष्ठा म्हणाली, “प्रत्येक सामना आणि प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. बाहेरून फक्त पराभव दिसतो, पण त्यामागचं वास्तव अनेकदा दिसत नाही. पिच कशी होती, टॉसचा किती प्रभाव पडला, परिस्थिती फलंदाजांसाठी होती की गोलंदाजांसाठी, अशा अनेक गोष्टी सामन्याचा निकाल ठरवत असतात.” तिने पुढे चाहत्यांनाही संयम बाळगण्याचा सल्ला दिला. “लोक फक्त तो हरतोय एवढंच पाहतात. पण त्याने कर्णधार म्हणून जिंकलेले सामनेही पाहायला हवेत. भारतासाठी खेळताना प्रचंड दबाव असतो. त्यामुळे एखाद्या खेळाडूला लगेच चांगला किंवा वाईट कर्णधार ठरवणं योग्य नाही,” असं ती म्हणाली.
श्रेष्ठाने यावेळी भारताच्या दिग्गज कर्णधारांचं उदाहरणही दिलं. “विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांसारख्या महान खेळाडूंनाही त्यांच्या कारकिर्दीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. मग सतत फक्त श्रेयसलाच लक्ष्य का केलं जातं?” असा सवाल तिने उपस्थित केला.
भावाबद्दलचा विश्वास व्यक्त करताना श्रेष्ठा म्हणाली, “श्रेयसचं व्यक्तिमत्त्व वेगळं आहे. त्याच्याकडे संघासाठी देण्यासारखं खूप काही आहे. योग्य संधी मिळाल्यावर तो स्वतःला नक्की सिद्ध करेल, याबद्दल मला कोणतीही शंका नाही.”
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा