न्हावेली /वार्ताहर : भाजपचे युवा जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे यांच्या माध्यमातून निरवडे येथील ग्रामीण रुग्णालयाला फ्युमिगेशन मशीनचे वाटप करण्यात आले. निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जन आरोग्य समितीची बैठक संदिप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र निरवडे यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी रुग्णाच्या सोयी साठी फुमिगेशंन गावडे यांच्या माध्यमातून भेट देण्यात आली.
या बैठकीस सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, पंचायत समिती सदस्य जितू गावकर, निरवडे सरपंच सौ. सुहानी गावडे, निरवडे माजी सरपंच हरी वारंग, श्री. तानावडे, बाळू साळगावकर, बाळा भगत, विकास गावडे व आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते..
