Headlines

‘शोएब अख्तर आणि आसिफ भारतात येताना ड्रग्ज आणायचे’; क्रीडा वर्तुळात खळबळ, गृह मंत्रालयाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे धक्कादायक आरोप


Rvs mani on Pakistan Cricket : भारत दौऱ्यावर येणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट टीममधील काही सदस्य ड्रग्स तस्करीत सामील होते. यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI होती, असा सनसानाटी आरोप केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अंडर सेक्रेटरी आरव्हीएस मणी यांनी केला आहे.

Bob Woolmer Shoaib Akhtar Mohammed Aasif
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेट वर्तुळाला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी अंडर सेक्रेटरी आरव्हीएस मणी यांनी पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंची जाहीरपणे नावे घेत खळबळजनक आरोप केले आहेत. भारत दौऱ्यावर येणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट टीममधील काही सदस्य ड्रग्स तस्करीत सामील होते. यामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI होती. शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ यांनी ड्रग्स आणल्याचं पाकिस्तानच्या हाय कमिश्नरसमोर स्वतः कबूल केलं होतं, त्यावेळी त्यांना भारतातून माघारी पाठवण्यात आल्याचं आरव्हीएस मणी यांनी म्हटलं आहे. आरव्हीएस मणी हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा विभागातून सेवानिवृत्त अधिकारी आहेत. एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी केलेल्या आरोपांमुळे क्रीडा वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आरव्हीएस मणी काय म्हणाले?

पाकिस्तान संघाचे खेळाडू शोएब अख्तर आणि मोहम्मद आसिफ हे भारत दौऱ्यावर येत होते तेव्हा ते त्यांच्यासोबत ड्रग्ज आणायचे, हे वैयक्तिक वापरासाठी नव्हतं. पाकिस्तानचा कोणताही संघ भारतात आला की ड्रग्स तस्करी व्हायचीच.आमच्या कार्यकाळात असा अंदाज होता की भारतातील जवळपास 30% दहशतवादी हल्ल्यांसाठी लागणारा निधी ड्रग्स तस्करीतून येत होता. पाकिस्तानकडून भारतात ड्रग्स पाठवणे हे त्यांच्या सरकारी धोरणाचाच एक भाग होता, असा गंभीर आरोप मणी यांनी केला. एएनआयच्या प्रश्नावर त्यांनी शाहिद आफ्रिदी आणि सलीम मलिक यांचीही नावे घेतली. कदाचित त्यांची नावे थेट या प्रकरणात आली नसतील, मात्र संपूर्ण टीमच यात सहभागी होती, असंही ते म्हणाले.
Maharashtra TimesIND vs ENG 1st ODI : आता कसं वाटतंय! भारताने इंग्लंडला पहिल्याच वनडेत लोळवलं, 6 विकेटने विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी, विजयाचे शिल्पकार कोण?

पाकिस्तानचे माजी कोच बॉब वूल्मर मृत्यू प्रकरण

ऑक्टोबर २००६मध्ये डोपिंग टेस्टमध्ये नॅन्ड्रोलोन पॉझिटिव्ह आल्यामुळे पीसीबीने अख्तर आणि आसिफ यांना परत बोलावलं होतं. नंतर डिसेंबर 2006 मध्ये ट्रिब्यूनलने दोघांनाही क्लीन चिट दिली. ही घटना झाल्यावर सहा महिन्यांनी २००७ च्या वर्ल्डकपमध्ये तेव्हाचे पाकिस्तान संघाचे कोच बॉब वूल्मर यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत संशयास्पद अवस्थेत सापडला होता. हे या ड्रग्ज तस्करीला विरोध करत होते, त्यामुळे त्यांची ठरवून हत्या केली असावी असा संशयही आरव्हीएस मणी यांनी व्यक्त केला.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा