Headlines

शिंदेंनी परभणीला यायचं नाही, फोनवरूनच मनोज जरांगेंचा खासदार संजय जाधवांना इशारा – manoj jarange calls sanjay jadhav to cancel eknath shinde parbhani event



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्यापूर्वीच राजकीय वातावरण तापलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिंदेंच्या परभणीतील कार्यक्रमाला कडाडून विरोध केला आहे. यासाठी जरांगेंनी परभणीचे खासदार संजय जाधव यांना फोन केला आणि फोनवरूनच शिंदेंचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. शिंदेंचा कार्यक्रम रद्द झाला नाही तर मी परभणीत येईन आणि त्यानंतर तुम्हाला जड जाईल, असा थेट इशारा जरांगेंनी खासदार जाधव यांना दिला आहे. सध्या जरांगे आणि जाधव यांच्या कथित फोन कॉलचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत