![]()
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर नाशिकचा ब्रँड अधिक भक्कम करण्यासाठी ‘दिव्य मराठी’च्या वतीने शुक्रवारी (दि. 31) मुंबईत ‘सिंहस्थ कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये विकासाच्या ‘ब्ल्यू प्रिंट’वर चर्चा होणार आहे. पायाभूत सुविधांचा वेध केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमुळे नाशिक व त्र्यंबकला जोडणारे महामार्ग, अंतर्गत आणि बाह्यवळण रस्ते (रिंगरोड), दळणवळणाच्या प्रलंबित प्रकल्पांना मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारचे भक्कम पाठबळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहस्थासाठी आवश्यक राज्य सरकारचा विशेष निधी, प्रशासकीय मान्यता आणि दीर्घकालीन विकास योजनांच्या अंमलबजावणीवर मंथन होईल. कार्यक्रम एका दृष्टिक्षेपात या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपरस चे दीपक चांदे, फ्रवशी , आदिनाथ संप्रदायाचे पीठाधीश्वर परमपूज्य जगद्गुरु श्री श्री 1008 डॉ. कल्कीराम महाराज हे आहेत.
Source link
विकासाच्या ‘ब्ल्यू प्रिंट’वर चर्चा:‘सिंहस्थ कॉन्क्लेव्ह’मध्ये नाशिकच्या विकासावर मंथन, दिव्य मराठीतर्फे 31 जुलैला मुंबईत आयोजन
